शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसात खडतर रस्ता पार करुन तहसीलदारांनी गाठले चवणेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:56 IST

Satara area collector : कोरेगाव-वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावर दरडी कोसळून गावावर संकट येते.

ठळक मुद्देमुसळधार पावसात खडतर रस्ता पार करुन तहसीलदारांनी गाठले चवणेश्वरग्रामस्थांना आधार : प्रशासन सर्तक असल्याचा दिला विश्वास

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव-वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावर दरडी कोसळून गावावर संकट येते.

यावर्षी अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने भीतीचे वातारण होते. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दरडी कोसळण्याचा धोका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या चवणेश्वर ग्रामस्थांना आधार देण्यासाठी तहसीलदार अमोल कदम यांनी चवणेश्वर गाठला. कसलेही संकट आले तरी प्रशासन मदतीसाठी सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी दिला.पाटण, वाई, जावळी तालुक्यात भूस्खलन, पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे चवणेश्वर ग्रामस्थांनाही धडकीच भरली. दुर्घटना घडली मदत कधी मिळणार याचीच चिंता त्यांना लागली. याचदरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य दुर्घटनाग्रस्त ठिकाणांचा आढावा घेऊन प्रांताधिकारी, तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना केल्या.

चवणेश्वर हे संकटात असलेले गाव असल्याने या गावास भेट देऊन ग्रामस्थांना आधार देण्याची निर्णय तहसीलदार अमोल कदम यांनी घेतला. जोरदार पाऊस कोसळत होता. दरडी ढासळत असताना तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडलाधिकारी किशोर धुमाळ, तलाठी राहुल नाळे यांनी चवणेश्वर येथे भेट देऊन ग्रामस्थांना आधार दिला.सरपंच दयानंद शेरे, रमेश पवार, हरिदास शेरे, युवराज शेरे, बजरंग पवार, माधुरी शेरे, नंदा शेरे, किरण पवार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. भर पावसात गावालगतच्या धोकादायक कड्यांची त्यांनी पाहणी केली.इंग्रजी आठ अक्षरात वसले गावकोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असलेल्या आणि इंग्रजी आठ अक्षरामध्ये बसलेल्या चवणेश्वर गावास नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. पुढे कडा, मागे कडा आणि मध्ये इंग्रजी आठ अक्षरात वसलेले हे पन्नास उंबऱ्यांचे गाव. वणवा लागणे, डोंगर खचणे, दरडी कोसळणे अशा अनेक संकटांचा सामना येथील ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.

साठ वर्षे झाली तरी या गावास पक्का रस्ता शासन देऊ शकले नाही. २००० मध्ये या गावास पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा मिळाला. मात्र ठेकेदारांची घरे भरण्यापलीकडे वेगळे काही झाले नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. 

टॅग्स :floodपूरSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी