शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आंतर जिल्हा बदलीनंतर शिक्षिकांना कोसळलं रडू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:08 IST

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने एकूण ३५४ शिक्षक बदलून आले आहेत. त्यापैकी हजर झालेले १४८ शिक्षकांना गुरुवारी आॅनलाइन पद्धतीने शाळा देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसार जरी आॅनलाईन प्रक्रिया राबवून दुर्गम डोंगरी शाळांचा बॅकलॉॅग भरून काढला

ठळक मुद्दे♦ आॅनलाईन बदल्या पूर्ण : १४८ शिक्षकांची यादी जाहीर♦ महिला शिक्षिकांना तरी सवलत देता येईल का,♦ मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.♦ ग्रामविकास खात्याशी चर्चा करून तोडगा काढावा,

लोकमत न्यूज नेटवर्कअसला तरी या आॅनलाइन प्रक्रियेत महिला शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होऊ लागलीय. दुर्गम डोंगरी भागात जिथं कोणतेही वाहन जाऊ शकत नाही, अशा शाळा महिलांना स्वीकाराव्या लागल्यामुळे सभागृहातच महिला शिक्षिकांना अश्रू अनावर झाले.जिल्हा परिषदेमध्ये आंतर जिल्हा बदली होऊन आलेल्या प्राथमिक शिक्षकांना गुरुवारी आॅन लाईन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी सत्यजित बढे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, एच. एन. यादव आदी मान्यवर उपस्थित होते.बदली प्रक्रिया राबवताना जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवातीलाच सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे शासन आदेशानुसारच राबवली जाणार असून, प्रथम दुर्गम, डोंगरी, भागातील शाळा भरल्या जातील. त्यानुसार ही आॅन लाइन प्रक्रिया होईल, हे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट करून सर्व सूचना सभागृहातील शिक्षकांना करून प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया करताना १२१ दुर्गम, डोंगरी शाळा,तर ० शिक्षक असलेल्या १३ शाळा या प्रथम स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. व सेवाज्येष्ठता यादीनुसार शिक्षकांना आपल्या शाळा निवडण्याचा अधिकार देण्यात आला.त्यामुळे दुर्गम शाळांमधील पहिल्या फेरीतच सातारा,कोरेगाव,माण, फलटण, खटाव, खंडाळा, तालुक्यातील शाळा पूर्णपणे भरल्या गेल्या.त्यामुळे नंतरच्या टप्प्यात पाटण, महाबळेश्वर,जावळी, तालुक्यातील शाळा उरल्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये या बदल्यासंदर्भात नाराजी निर्माण झाली. प्रक्रिया सुरू असतानाच काही महिला शिक्षिकांनी या प्रक्रियेवर एकत्र येऊन आक्षेप नोंदवला. यावेळी काही शिक्षिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसारच ही प्रक्रिया सुरू असून त्यांचा आक्षेप चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत पुढील प्रक्रिया पूर्ण केली.जिल्हा बदलीने हजर झालेल्या १४८ शिक्षकांना आॅन लाइन पद्धतीने जिल्हा परिषदेने पदस्थापना देऊन संबंधित शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षण अधिकारी पुनीता गुरव तसेच कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.महिला शिक्षिकांची गैरसोय दूर करावी..बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांनी आपल्यावर अन्याय झाला असल्याचे मत मांडले. दहा वर्ष दुसºया जिल्ह्यात काम करून स्वजिल्ह्यात येऊनही आमची गैरसोयच झाली असल्याची भावना महिलांनी अगदी रडत-रडत मांडली. आरव, पर्वत, खिरखिंडी अशा दुर्गम शाळांवर महिला कशा काम करणार, असा प्रश्न शिक्षिकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी देशमुख, शिक्षणसभापती राजेश पवार यांच्या समोर मांडला. त्यामुळे प्रशासनाने किमान अशा दुर्गम शाळांमध्ये बदली स्वीकारलेल्या महिला शिक्षिकांना तरी सवलत देता येईल का, याबाबत ग्रामविकास खात्याशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी सर्व शिक्षिकांनी केली.दुर्गम-डोंगरी शाळांचा बॅकलॉक भरून निघालाजिल्ह्यातील पाटण, जावळी,महाबळेश्वर, अशा दुर्गम डोंगरी तालुक्यातील बहुतांश शाळा या कायमस्वरूपी रिक्तच राहतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करीत प्रथम या तालुक्यांमधील रिक्त शाळांचा बॅकलॉग भरून काढण्याच्या उद्देशाने प्रथम दुर्गम-डोंगरी आॅनलाइन प्रक्रियेत घेतल्या. त्यामुळेच अशा भागातील विद्यार्थ्यांना आता शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.