शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील!

By admin | Updated: March 5, 2016 00:08 IST

शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा : दहावी हिंदी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

किडगाव : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महाराष्ट्राच्या मागण्यासोबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून महामंडळाच्या सर्वच मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला. दहावी बोर्ड परीक्षेच्या हिंदी विषय उत्तरपत्रिका तपासणी कामावरील राज्य हिंदी महामंडळाने टाकलेला बहिष्काराचा निर्णय मागे घेतला असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.हिंदी महामंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माध्यमिक स्तरावर हिंदी विषयाशी व्यवसाय शिक्षण विकल्पाचे २०१५-१६ चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे, भाषा गटामध्ये समान काम, समान गुण, समान तासिका या तत्त्वानुसार सहा तासिका देणे. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी विषय अनिवार्य करणे, कृतिपत्रिका स्वरूपात बदल, शिक्षक हस्तपुस्तिका, अभ्यास समिती प्रतिनिधीत्व आदी मागण्यांबाबत शासनाकडे महामंडळाने पाठपुरावा केला. तरी शासनाने दखल घेतली नव्हती. आपल्या मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला पुणे बालभारती कार्यालयासमोर राज्यभरातील मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याबरोबर राज्यभरातील ६५० शिक्षकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. दहावी बोर्ड परीक्षेतील हिंदी विषय उत्तरपत्रिका तपासणीकामावरील बहिष्काराचा निर्णयही घेतला होता; मात्र शासन स्तरावर हालचाली होऊन बोर्डाचे अध्यक्ष, आयुक्त, सचिव पातळीवर तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व हिंदी महामंडळाच्या शिष्टमंडळाची दि. २ मार्च रोजी सकारात्मक चर्चा झाली.हिंदी विषयांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळात राज्याचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, शिवाजीराव अडसूळ, सचिव रामानंद पुजारी, सहसचिव व्ही. के. शिंदे, कोषाध्यक्ष सुधाकर माने, सदस्य संजय गावडे, पोपट मिंड, अण्णासो वाळके, यशवंत नेवासे, रंगराव बारी, विलास इनामदार, विजय नाईक, विजय धामण्णा, सुनंदा शिवदास आदींचा समावेश होता.पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी हिंदी महामंडळाच्या लढ्यात सक्रिय पाठिंबा देऊन शासन स्तरावर चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. शासकीय पातळीवर सर्वच अधिकाऱ्यांनी महामंडळास सहकार्य केले. या लढ्यासाठी हिंदी शिक्षकांनी अभेद्य एकसंध दाखवून विद्यार्थी व राष्ट्रभाषेचे हित जपले. (वार्ताहर)