शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

एसटीचा लांबूनच टाटा

By admin | Updated: November 28, 2014 23:49 IST

नियमात पाप : अरुंद रस्ते अवैध पार्किंगमुळे उंब्रजमध्ये अवघड प्रवास

अजय जाधव - उंब्रज -येथील बसस्थानकात एसटी येण्यासाठी उपमार्ग केलेल्या आहेत. मात्र, या उपमार्गावरच व्यापारी, ग्राहकांची वाहने अवैधपणे लावलेले असतात. नियमात ‘पाप’ करून छोटा केलेल्या उपमार्गावरील अवैध वाहनतळ, प्रवाशांची प्रतीक्षा करत ठाण मांडलेल्या जीप व रिक्षामुळे अनेकदा एसटी बसस्थानकाला ‘टाटा’ करत महामार्गावरून जात आहेत.एसटी बसस्थानकात येण्यासाठी उपमार्गावर ‘नो-पार्किंग’झोन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी तयार केलेल्या फूटपाथवरही अतिक्रमणे वाढली आहेत. या उपमार्गावरील ‘नो पार्किंग’, अतिक्रमणे निघाली तर एसटी बसस्थानकात सहज जाऊ शकते. असे झाल्यास उंब्रजकरांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते. बसस्थानक बस येण्यासाठी उपमार्ग खुले झाले की येथील स्थानिक वाहतुकीचाही प्रश्न सुटणार आहे. मोठी वाहनेही उपमार्गावरून जातील व वाहतुकीची कोंडी होणार नाही. सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची वर्दळ वाढत आहे. चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना पुणे, मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव उंब्रजमध्ये येत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.बसस्थानकात येणार गाड्यासोमवारपासून अंमलबजावणी : एसटी महामंडळ, पोलिसांची बैठकउंब्रज : राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सोमवार, दि. १ पासून उंब्रज बसस्थानकात जातील. दरम्यान, एसटीला बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ता खुला करण्यासाठी उपमार्गातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे उंब्रजमधील ग्रामस्थांची चांगली सोय होणार आहे.महामंडळाच्या उंब्रज बसस्थानक एसटी जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात शुक्रवारी उंब्रज पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील, एसटीचे गजानन पवार, उपसरपंच सुरेश साळुंखे, ग्रामविकास अधिकारी एच. डी. पाटील, सदस्य समीर शिकलगार, संजय पाटील उपस्थित होते.‘एसटी गाड्या बसस्थानकात नेण्याची जबाबदारी महामंडळाची राहील. त्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक, अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील. याची अंमलबजावणी सोमवार, दि. १ पासून करण्यात येईल,’ अशी ग्वाही एसटी महामंडळाचे गजानन पवार यांनी दिली.‘उपमार्गाच्या बाजूला अतिक्रमण केलेल्या ५६ व्यापाऱ्यांना व पश्चिम बाजूच्या ८१ व्यापाऱ्यांना पदपथावरील अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्यानुसार काहीनी स्वत:च अतिक्रमण काढले आहेत,’ अशी माहिती ग्रामविस्तार अधिकारी एच. डी. पाटील यांनी दिली.‘बसस्थानकाकडे जाण्याचा उपमार्ग खुला व्हावा, यासाठी सोमवार, दि. १ पासून कोणतेही वाहन उपमार्गावर उभे करू दिले जाणार नाही. यासाठी उंब्रज पोलिसांनी वाहने उचलण्यासाठी ‘क्रेन’ मागविली आहे. तसेच अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांचा माल येणार आहे. त्यांनी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या मार्गावर मालाची वाहने उभी करावी. दिवसा मात्र खासगी जागेतच वाहने उभी करावीत, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा सज्जड दमही सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी भरला. प्रवासी वाहतूक करणारे एक वाहन या मार्गावर उभे करू शकतील. इतर वाहने खासगी जागेत उभी राहतील. पाटण, तिकाटणे येथील वाहने दोनशे मीटर अंतरावरील वीजवितरण कंपनीच्या संरक्षण भिंतीशेजारी उभी राहतील. चोरे रोड, अंधारवाडी रोड येथे एका बाजूला पार्किंग करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जी वाहने थांबतात. त्यामुळे असंख्य प्रवासी महामार्गावरच वाहनांची वाट पाहत थांबत असतात. ही परिस्थितीत अशीच कायम राहिली तर खंडाळा अपघाताची पुनर्रावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. - विजय जाधवपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या पाहून उंब्रजला उड्डाणपूल मंजूर होता. तो झाला असता, तर या समस्याच उद्भवल्या नसत्या. - पृथ्वीराज पाटील (शिरगावकर)