शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तमाशावरून दोन गावात ‘तमाशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:06 IST

ढेबेवाडी : तमाशात झालेल्या बाचाबाचीवरून दोन गावांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. अडीचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांनाही मारहाण केली. तसेच साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. कुंभारगाव-चाळकेवाडी (ता. पाटण) येथे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात तीन पोलिसांसह वीसहून जास्तजण जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या तसेच ...

ढेबेवाडी : तमाशात झालेल्या बाचाबाचीवरून दोन गावांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. अडीचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांनाही मारहाण केली. तसेच साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. कुंभारगाव-चाळकेवाडी (ता. पाटण) येथे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात तीन पोलिसांसह वीसहून जास्तजण जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारगावच्या लक्ष्मीदेवी यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला शनिवारी रात्री तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशावेळी काही युवकांनी नृत्यांगनांना खडे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांमध्ये बाचाबाची झाली. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. दिवसभर यात्रा सुरळीत पार पडली. मात्र, सायंकाळी काही युवकांमध्ये पुन्हा हमरीतुमरी झाली. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत वादावर तात्पुरता पडदा टाकला. तसेच याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही गटांतील युवकांवर अदखलपात्र गुन्हाही नोंद केला.दरम्यान, सोमवारी सकाळी कुंभारगाव व चाळकेवाडी या दोन गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावर युवक आमने-सामने आले. त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही ाावांतील सुमारे अडीचशेपेक्षा जास्तजणांचा जमाव त्याठिकाणी जमला. जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाच्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, सहायक फौजदार राजेंद्र अंकुशी, हवालदार एस. एस. नाफड हे जखमी झाले.मारामारी सुरू असताना युवकांचा जमाव कुंभारगावात घुसला. युवकांनी काही घरांमध्ये घुसून तेथील साहित्यांची तोडफोड करीत महिला, मुले व यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केली. या दगडफेक व मारामारीत वीसहून अधिकजण जखमी झाले. त्यांच्यावर ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयत तसेच कºहाडच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा