शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'तमाशा ही जिवंत कला : बनसोडे

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

येथे ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार व जिल्ह्यातील वीस विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित

कऱ्हाड : ‘तमाशा ही जिवंत कला आहे. या कलेला कमी समजू नका. स्त्रियांनी देखील ही जिवंत कला पाहिली पाहिजे. मी तमाशा कलेची सेवा गेली ५५ वर्षे करीत असून, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही या कलेची सेवा करीत राहीन. माझा सन्मान देशासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झाला. मात्र कऱ्हाडच्या मातीतील या गौरवामुळे आयुष्याचे सार्थक झाले,’ असे भावोद्गार ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी काढले.  येथे ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार व जिल्ह्यातील वीस विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिजामाता महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, प्रा. अशोक चव्हाण, कृष्णा फाउंडेशनचे प्राचार्य विनोद बाबर, गोरख तावरे, विकास भोसले, स्वाती भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी लक्ष्मी कऱ्हाडकर, नांदगावच्या इंदू कुचेकर, बनवडीच्या शोभा कुलकर्णी, विद्यानगरच्या शकिला नायकवडी, मांडवेच्या सुजाता पवार, कालेच्या प्रगती पिसाळ, कऱ्हाडच्या अपर्णा गिजरे, उद्योजक उज्ज्वला कदम, विद्या मोरे, विजया शिंदे, प्रज्ञा वरेकर, कोरेगावच्या विमल नलावडे, रेठरे बुद्रुकच्या सरिता पवेकर, कऱ्हाडच्या प्रतिभा राजे, मुस्कान तांबोळी, पाटणच्या विद्या म्हासुर्णेकर, नागझरीच्या मनीषा मुळीक, रेश्मा पवार आदींंना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विकास साळुंखे, विनायक मोरे, सागर दंडवते व चंद्रकांत भोसले यांनी स्वागत केले. विकास भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण भंडारे व रत्नाकर शानभाग यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)