शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंत, वगनाट्यकार रामचंद्र बनसोडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 21:30 IST

जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दिर्घ आजाराने निधन झाले.

कराड : जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दीर्घ आजाराने निधन झाले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांचे ते पती होत.करवडी (ता. कराड) येथील रामचंद्र लक्ष्मण बनसोडे यांनी त्यांच्या पत्नी मंगला बनसोडे यांच्या बरोबरीने 1980 च्या दशकात तमाशा फडाची उभारणी करून श्रीगणेशा केला होता. विठाबाई भाऊ मांग नारारणगावकर यांची कन्या असलेल्या  मंगला बनसोडे यांच्या जोडीने हा तमाशा अल्पावधीतच लोकप्रिय  झाला तो रामचंद्र बनसोडे यांच्या सत्य घटनेवर आधारीत आणि धार्मिक, ऐतिहासिक वगनाट्यामुळे. 1984 च्या दरम्यान रामचंद्र बनसोडे यांनी स्वतंत्र तमाशा काढल्यानंतर बनसोडे यांनी लेखन केलेल्या वगनाट्याच्या जोरावरच हा तमाशा राज्यभर नावाजला गेला. कृष्णा काठचा फरारी, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही, बाळू मामाची मेंढरं, वहिणी आमची मायेची या वगनाट्यांचे त्यांनी लेखन केले. सत्य  घटनेवर आधारीत वगनाट्य ही मंगला बनसोडे तमाशा मंडळाची खासियत होती. रामचंद्र बनसोडे यांनी बापू बिरू वाटेगावकर, तांबव्याचा विष्णू बाळा, कारगिलच्या  युद्ध ज्वाला,  हर्षद मेहता, राजीव गांधी हत्याकांड, देव चोरला जेजुरीचा, अनिल डोंबे खून खटला या सत्य घटनेवर आधारीत वगनाट्यांचे लेखन केले होते. ही वगनाट्ये राज्यभर गाजली. सत्य घटनेवर आधारीत लेखनामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. तमाशा फडावर हल्ला, कनाती पेटवणे आणि धमकी या सर्व अडचणींना तोंड देत बनसोडे यांनी तमाशा कलेची सेवा सुरूच ठेवली होती. तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्याने राज्यभर गर्दीचा उच्चांक गाठला. तमाशा रसिक फक्त ही वगनाट्ये पाहण्यासाठी येत असत. बापू बिरू वाटेगावकर वगनाट्याचे लेखन करण्यासाठी रामचंद्र बनसोडे यांनी राज्य शासनाची परवानगी घेवून तुरूंगात वाटेगावकर सोबत चार दिवस मुक्काम केला होता.विष्णू बाळाचे लेखन करण्यासाठी बनसोडे हे तांबवे येथे आण्णा बाळा यांच्या घरी अनेक दिवस मुक्कामी होते. मुलगा नितीन बनसोडे यांना तमाशा फडावर आणण्यासाठी त्यांनी भक्त प्रल्हाद या नाटकाचे लेखन केले होते. कृष्णा काठचा फरारी, तांबव्याचा विष्णू बाळा, बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्यातील त्यांचा अभिनयाला तमाशा रसिकांनी मोठी दाद दिली होती. गेले काही दिवस रामचंद्र बनसोडे हे आजारपणामुळे अंथरूणावर होते. त्यांच्यावर कराड, मिरज, पुणे येथे उपचारही करण्यात आले. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या दरम्यान मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे अहमदनगर येथे तमाशा कार्यक्रम करत होते. दरम्यान रामचंद्र बनसोडे यांच्या पश्चात पत्नी मंगला बनसोडे, मुलगा अनिल व नितीन, मुलगी लक्ष्मी, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र बनसोडे यांच्या पार्थिवावर करवडी येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.