शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

तहानलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांपुढे टाहो!

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

खटाव तालुका : होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी ग्रामस्थांनी मांडली व्यथा

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा एकसूत्री कार्यक्रम प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. खटाव तालुक्यात उरमोडीचे पाणी गेले असले तरी होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी या गावांना डावलून पाणी पुढे पळविण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या या चार गावांतील शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापुढे सोमवारी अक्षरश: टाहो फोडला. उरमोडी धरणातून खटावकडे नेलेले पाणी शिरसवडे येथील तलावात एकत्र केले जाते. या पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून वर्गणीही घेतली आहे. शेतकऱ्यांनी एक लाखाची वर्गणी उरमोडी धरण विभागाला भरली असून, त्याची रितसर पावतीही शेतकऱ्यांकडे आहे. दुष्काळी भागात मोडत असूनही या भागातील शेतकऱ्यांनी हंगामी पिकांसोबत कांदा, बटाटा अशी नगदी पिकेही केली आहेत. शिरसवडे तलावात पाणी नसल्याने जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. उरमोडी विभागाशी वारंवार संपर्क साधूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गावांतील प्रताप जाधव, वसंत देशमुख, मनोज शितोळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्र्यांची भेट घेतली. चार गावांना डावलून पाणी नेल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. पुढच्या गावांना पाणी नेले असले तरी पाठीमागच्या गावांना पाणी दिले गेले नाही. या गावांची गळचेपी केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. त्यावर पिण्याचे पाणी प्रामुख्याने देण्यात येत असल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्टीकरण केले; पण वडूज, उंबर्डे, नायकाचीवाडी या गावांत शेतीसाठीही पाणी दिले जात असून, हा नियम आम्हालाच का लावला आहे?, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला, त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. (प्रतिनिधी) लेखी निवेदन नसल्याने या प्रश्नाचं होणार काय? लेखी निवेदन दिल्याशिवाय कामे होत नाहीत, ही प्रशासकीय पद्धत दुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांना माहीत नव्हती, त्यामुळे या शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी तोंडी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला तशा सूचनाही केल्या; पण आता लेखी निवेदनाशिवाय प्रशासकीय यंत्रणा कितपत हालचाल करतेय, ते या प्रकरणात पाहण्याजोगे ठरणार आहे.