शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

न्यायासाठी महिला सदस्यांचा सभेत टाहो

By admin | Updated: January 30, 2015 23:13 IST

कऱ्हाड पंचायत समितीचे सभागृह स्तब्ध

कऱ्हाड : पंचायत समितीची मासिक सभा नेहमीच वादळी ठरते. आज, शुक्रवारच्या सभेतही तसेच वादळ उठले; पण या वादळामुळे संपूर्ण सभागृहच काही काळ स्तब्ध झाले. आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत महिला सदस्यांनी भर सभेत उभे राहून अश्रू ढाळले आणि ‘आम्हाला न्याय द्या,’ असा टाहो सभापतींपुढे फोडला. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर न देताच नेहमीप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी त्यांची बोळवण केली. सभेत आज दुपारी बांधकाम विभागाचा आढावा सुरू असताना विरोधी सदस्या अनिता निकम उभ्या राहिल्या. ‘आम्ही वेळोवेळी अनेक विषय, सूचना, मते सभागृहात मांडतो; पण त्याची दखल ना अधिकारी घेतात, ना पदाधिकारी. सभेत मांडलेल्या ठरावांची प्रशासन पूर्तता होत नाही. मग आम्ही सभागृहात ठराव का मांडावेत,’ अशी विचारणा त्यांनी केली़ रडत-रडत त्यांनी पूर्वी मांडलेल्या सूचना व ठरावाच्या नोंदी वाचून दाखविल्या.‘त्यांचे काय झाले ते अगोदर सांगा आणि नंतर नवीन ठराव मांडा,’ असा आग्रह धरला. त्यांच्या रडण्यामुळे सभागृह अवाक् झाले. सभागृहात शांतता पसरली; यावेळी सत्ताधारी गटाच्या रूपाली यादव त्यांच्या मदतीला धावून आल्या. ‘अनेक ठराव आम्ही सभेत करूनही कामे का केली जात नाहीत,’ अशी विचारणा करून त्यांनीही सभापतींवर शाब्दिक हल्ला चढविला. या प्रश्नाला सभापती समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त पान २)नारीशक्ती एकवटलीपंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष अशा मिळून बारा महिला सदस्या आहेत. एरवी नेत्यांचा आदेश मानून सदस्यांच्या सुरात सूर मिसळणाऱ्या सर्व गटांच्या महिला आज एकवटल्या. अनिता निकम अश्रू ढाळत असताना रूपाली यादव, ज्योती गुरव यांनी उभे राहून निकम यांची पाठराखण केली. इतर महिला सदस्यांनी मूकसंमती दिली.