शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

तिच्या हाती मोबाईलऐवजी तलवार...तलवारबाजीत राज्यात उमठविला कर्तृत्वाचा ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 01:15 IST

आई रोहिणी घरातील जबाबदारी सांभाळत असताना ब्युटी पार्लरचा व्यवसायाची समर्थपणे सांभाळत आहे. ते दोघेही वैष्णवीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे.

ठळक मुद्दे वैष्णवी यादवची गाथा ।

पांडुरंग भिलारे ।वाई : नववी, दहावीची मुलं कायमच मोबाईलमध्ये डोकं घालून तासन्तास गेम खेळत असतात. त्यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी फरकच पडत नाही. पण याला वाई तालुक्यातील दरेवाडीतील वैष्णवी यादव अपवाद ठरली. तिनं हाती तलवार घेऊन राज्यात तलवारबाजीत चमकदार कर्तृत्व सिद्ध केलं आहे.

दरेवाडी गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. हे खरेतर खेडे गाव येथील मुलांना शिक्षणासाठी वाई येथे यावे लागते. वैष्णवी गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. वैष्णवी हिने साहसी क्रीडा प्रकारात चमकण्याचा निर्धार केला. यासाठी वैष्णवीने अथक परिश्रम घेत आहे. दहावीत शिकत असताना शाळा, शाळेचा अभ्यास, क्लब व खेळाचे प्रशिक्षण या सर्वाची उत्तम प्रकारे सांगड घालून नियोजन करते. वैष्णवी पहिल्यापासूनच धाडसी आहे, जिद्दी आहे. तिचे वडील शरद यादव हे शाहीर व खेळाडू असून, प्राथमिक शिक्षक आहे.

आई रोहिणी घरातील जबाबदारी सांभाळत असताना ब्युटी पार्लरचा व्यवसायाची समर्थपणे सांभाळत आहे. ते दोघेही वैष्णवीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. त्यांच्याकडून प्रेरणा मार्गदर्शन यांच्या जोरावर वैष्णवीने राज्यस्तरापर्यंत झेप घेतली़ क्रीडा प्रबोधिनीत वैष्णवी तलवारबाजीचे धडे गिरवत आहे. त्यातून अनेक पारितोषिके मिळविले आहेत.तलवारबाजी बरोबर ज्युदोचीही दिली जोड..राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत वैष्णवी यादव हिने प्रथम कोल्हापूर विभागात यश मिळवले. त्यानंतर लातूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरावर यश संपादन केले. तसेच नांदेड येथे झालेल्या सत्ताविसाव्या राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेतही वैष्णवीने चमकदार कामगिरी करून नामांकन प्राप्त केले़ याचबरोबर ज्युडोमध्ये ही तिने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे़ तलवारबाजीत आवश्यक असलेल्या चपळतेचा फायदा तिला ज्युदोमध्येही होतो. तिच्या या कामगिरीमुळे मुलींना प्रेरणा मिळत आहे़

तलवारबाजी करत असताना अनेक वेळा इजा होत असते़ पण याला वैष्णवी कधीही घाबरलेली नाही. वैष्णवी ही खूप जिद्दी व मेहनती आहे़. खेळात यशस्वी होत असली तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही.- प्रफुल्ल जगताप, प्रशिक्षक.

 

राष्ट्रीय पंच सुधीर जमदाडे यांचे खेळ निवडण्यासाठी मार्गदर्शन झाले. राज्यपंच विकास लोखंडे व एनआयसी कोच प्रफुल्ल जगताप यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता राष्ट्रीयस्तरावर जाण्याचा संकल्प आहे.- वैष्णवी यादव, खेळाडू 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर