शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून आमदारकी लढविण्यासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:43 IST

सातारा : जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. भाजपतर्फे ...

सातारा : जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. भाजपतर्फे जिल्ह्यातील आठही मतदारसंघांसाठी शुक्रवारी (दि. ३०) मुलाखती घेतल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , दीपक पवार, दिलीप येळगावकर, अतुल भोसले यांच्यासह ५८ इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखती दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षातर्फे मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी गर्दी केली होती. इच्छुक महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पक्ष निरीक्षक आमदार अनिल सोले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुलाखती घेतल्या.दरम्यान, दि. ३० रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वप्रथम कोअर कमिटी बैठक झाली. कोअर कमिटी सदस्यांकडून मतदारसंघनिहाय शक्तिकेंद्र्र प्रमुख, बुथप्रमुख, गट-गण, प्रभाग या सर्वांची माहिती अनिल सोले यांनी घेतली. यानंतर मतदारसंघाप्रमाणे मुलाखतीस सुरुवात झाली.लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेले शैलेंद्र वीर यांनीही भाजपतर्फे वाई विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. २००९ मध्ये झालेली कोरेगाव विधानसभा निवडणूक शिवसेनेतर्फे लढलेले संतोष जाधव यांनी कोरेगाव व सातारा-जावळीतून उमेदवारीसाठी मुलाखत दिली. फलटण मतदारसंघातून भाजपतर्फे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाव पुढे येत होते, ते दिगंबर आगवणे आणि माण-खटावमधून भाजपतर्फे इच्छुक असणारे जयकुमार गोरे यांचीही यावेळी अनुपस्थिती होती.या मतदारसंघातहे इच्छुकसातारा-जावळी : माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र विकास परिषदेचे अध्यक्ष दीपक पवार, अमित कदम, संतोष जाधव, अभय पवार, स्मिता निकम, सुनिशा शहा.वाई-खंडाळा-महाबळेश्वर : माजी आमदार मदन भोसले, चंद्रकांत काळे, मोनिका धायगुडे, अविनाश फरांदे, प्रशांत जगताप, रामदास शिंदे, दीपक जाधव, सचिन घाडगे, प्रदीप क्षीरसागर, शैलेंद्र वीर, दिनकर शिंदे.कोरेगाव : महेश शिंदे, संतोष जाधव, विवेक कदम, रणजित फाळके, प्रभाकर साबळे, रमेश माने, सुवर्णा राजे.