शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास ‘स्वाभिमानी’कडून दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 15:49 IST

 दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलनास सुरुवात

कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार (१६ जुलै) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून आंदोलनाला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे प्रीतिसंगम परिसर दुमदुमून गेला. 

दुग्धव्यवसाय अडचणीत आल्यामुळे दूध उत्पादकाला पाच रुपयांचे थेट अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून राज्यभर दूध दरवाढ आंदोलन सुरू केले आहे. त्याला कराड व सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दूध उत्पादकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मात्र, दूध रस्त्यावर अभवा अन्यत्र ओतू नये तर ते गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांना मोफत वाटावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.

त्याचाच भाग म्हणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर नजीकच असणाऱ्या महादेव मंदिरातही दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर उरलेले दुधाचे कॅन पोलीस बंदोबस्तात शासकीय रिमांडहोम येथे नेण्यात आले व तेथील विद्यार्थ्यांना ते दूध वाटण्यात आले.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राची घडी बसविण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. मात्र, त्याच महाराष्ट्रात शेतकरी राजाला नागविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. या सरकारला सुबुद्धी द्यावी. त्यासाठी आम्ही  यशवंतरावांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक घालून साकडे घातले आहे.- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा