शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महाबळेश्वराच्या टोलला स्थगिती

By admin | Updated: February 10, 2017 22:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश

सातारा : महाबळेश्वरच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रदूषणकर व प्रवासीकर वसुली ठेका मर्जीतील ठेकेदाराला मिळावा, यासाठी नगरपालिकेला वेठीस धरले होते. या टोलबाबत शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या वादग्रस्त ठेक्याला स्थगिती दिली असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर नगरपरिषदेचे प्रदूषणकर व प्रवासीकर वसुली ठेका निवडीसाठी दि. २० आॅक्टोबर २०१६ रोजी ३ वर्षांसाठी राज्यातील नामांकित ठेकेदाराकडून आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. याला पहिल्यावर्षी प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा जाहीर निविदा प्रसिद्धी केली. यावेळी साताऱ्याचे ठेकेदार चंद्रकांत जाधव (३ कोटी ८४ लाख २४ हजार ३७५), नागपूरचे ठेकेदार खळदकर कन्ट्रक्शन (३ कोटी ४१ लाख ७ हजार ५६२ ) व पुणे येथील ठेकेदार मोमीन एंटरप्रायझेस (३ कोटी ७९ लाख ६५ हजार १८०) अशा रकमेचा ठेका मिळविण्यासाठी निविदा व अनामत रक्कम भरली. त्यानंतर जाणीवपूर्वक जास्त बोली करणाऱ्या ठेकेदाराला कागदपत्राचे निमित्त साधून ठेक्यापासून वंचित ठेवले. यामुळे नगरपरिषदेचे तीन वर्षांत १ कोटी २९ लाख ५० हजार ४३९ एवढ्या रकमेचे नुकसान करणारी ठरली. याबबात करठेका वसुलीचे ठेकेदार चंद्रकांत जाधव व सलीम बागवान, सुनील साळुंखे व महाबळेश्वरच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या अन्यायग्रस्त करवसुली ठेक्याला स्थगिती देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याची चंद्रकांत जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)