शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मठाधिपती संशयास्पदरीत्या बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:41 IST

कºहाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून ते मठातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला असून, ...

कºहाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून ते मठातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाडमधील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती म्हणून गुरुवर्य बाजीराव बुवा गुरू मारुतीबुवा कराडकर हे गत दीड वर्षापासून काम पाहतात. मठाधिपती बाजीरावमामा हे शहरातील गुरुवार पेठेतील रहिवाशी असले तरी ते मठातच वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते मठातील सेवेकरी निखिल ढमाळ यांना, ‘मी कॉसमॉस बँकेत जाऊन येतो,’ असे सांगून मठातून बाहेर पडले. त्यानंतर सेवेकऱ्यांसह वारकºयांनी सायंकाळी उशिरापर्यंतत्यांची वाट पाहिली. मात्र, ते परतआले नाहीत. त्यामुळे सेवेकºयांनी बँक परिसरासह शहरात इतर ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही सापडले नाहीत. त्यामुळे याबाबतची माहिती रात्री उशिरा चुलते शरद जगताप यांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शरद जगताप यांच्यासह सेवेकरी आणि वारकरी मठात दाखल झाले. त्यांनीही मठाधिपतींचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर रात्री उशिरा याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.मठाच्या परिसरात पोलीस बंदोबस्तमठाधिपती बाजीरावमामा कराडकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळपासून शेकडो वारकरी शहरातील मठात जमा होण्यास सुरुवात झाली. वारकºयांची संख्या मोठी असल्यामुळे मठाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बेपत्ता मठाधिपतींच्या शोधासाठी पोलीस पथक ठिकठिकाणी शोधमोहीम राबवित आहे.बँकेत पोहोचले; पण नंतर गायबमठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून निघून गेले होते. त्यामुळे सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलीस अधिकाºयांनी कॉसमॉस बँकेला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मठाधिपती बँकेत आल्याचे दिसून आले. मात्र, बँकेतून बाहेर पडल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.