शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

अफवा बंद; पण भीती कायम : अंधारात बाहेर पडण्यास घाबरतायत नागरिक--फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

माणिक डोंगरे -मलकापूर  चोरट्यांच्या अफवेने गत महिना ढवळून निघाला. सध्या अफवा बंद झाल्या असल्या तरी चोरट्यांची भीती मात्र कायम आहे. आजही गावाला येणारा पाहुणा किंवा आडरानातील व्यावसायिक नऊच्या आत घरात येत आहेत. शहरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे भीतीपोटी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच बाहेर पडत आहेत. जुन-जुलै महिन्यांत कऱ्हाड तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये चोरटे दिसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. कापील, काले, धोंडेवाडी, नांदलापूर, आटके यासह परिसरातील विविध गावांमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारही घडले. रानात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना उसात चोरटे दिसल्याचे सांगितले गेले; रात्र गस्त वाढल्या. दिवसा काम व रात्री जागरण करून नागरिक हैराण झाले होते. पाचवड फट्यानजीक चार फिरस्त्यांना चोर समजून युवकांनी बेदम चोप दिला होता. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनाही चोर समजून प्रसाद देण्यात आला.या घटनांमध्ये किती प्रमाणात सत्यता आहे. किती प्रमाणात अफवा आहेत, हे आजतागायत कोणालाही उमगलेले नाही. पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, आटके टप्पा अशा महामार्ग व राज्य मार्गालगतच्या; पण आडरानातील व्यावसायिकांनी तर आठ वाजताच दुकाने बंद करून घर गाठणे सुरू केले आहे. त्याचबरोबर पाहुणा नऊच्या आत घरात पोहोचू लागला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीनेच उजाडल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जाणे पसंत करत आहेत. फिरस्त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीतसातारा : चोरीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर फिरस्त्या विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले असून, त्यांची उपासमार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे किंवा शिफारसपत्रे द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन ‘सिटू’शी संलग्न असलेल्या जिल्हा जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सोमवारी देण्यात आले.संबंधित विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ‘सिटू’ने घेतला असल्याचेही वृत्तात म्हटले होते. ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे, कोषाध्यक्ष सलीम आतार आणि फिरस्त्यांच्या प्रतिनिधींनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संघटनेने प्रत्यक्ष वस्तीत जाऊन खातरजमा केली असून, फिरस्त्यांशी लोक संशयाने वागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. पोलिसांनी लक्ष घालून फिरत्या विक्रेत्यांना ओळखपत्रे किंवा त्यांचे फोटो असलेले पत्र द्यावे, तसेच त्यांच्या अडवणुकीविषयी कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.