शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सूर्यनारायण तापले अन् जमिनी उष्णता फेकतीय

By admin | Updated: April 1, 2017 18:24 IST

घामाच्या धारा : पावसामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ

आॅनलाईन लोकमतसातारा : गेली पंधरा दिवस कडक उन्हामुळे कासाविस झालेल्या सातारा, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील जनतेला शुक्रवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. शनिवारी सकाळपासून जमिनीतून उष्णता फेकली जात असल्याने ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. शेतात झाडाच्या सावलीला बसले तरी झळा बसत आहेत.साताऱ्यासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे तापमान गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढले आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसचा पल्लाही पाऱ्याने ओलांडला होता. त्यामुळे वैशाख वणव्याची आठवण झाली होती. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातून विविध शासकीय कामानिमित्ताने साताऱ्यात आलेल्या लोकांना वारंवार थंड पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे रसवंतीगृह, आईस्क्रीम दुकाने गदीर्ने भरत आहेत.दुष्काळी खटाव, कोरेगाव, पुसेगाव, सातारा आदी भागात शनिवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लहानांपासून मोठ्यांनीही घेतला; पण दुसरा दिवस शनिवारचा उकाडा असह्य होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच कडक ऊन पडले होते. आधीच तापलेल्या धरतीवर शुक्रवारी पाऊस पडल्याने धरती शनिवारी उष्णता बाहेर फेकत होती. त्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. लहान मुलांना त्रासदायकअसह्य उन्हाळा लहान मुले, तान्हुल्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. घरात ठेवले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे तापाने फणफणण्याचे प्रमाण वाढले आहे.