शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राष्ट्रवादी बालेक्ल्ल्यिावर कमळाचा सर्जिकल स्टाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 19:43 IST

सहकारामध्ये मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदनदादा भोसले यांचे किसनवीर,तीनही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत. त्याबरोबरच स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीही आता मदन भोसले यांना निर्णय घ्यावा

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मदनदादा कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता

पाचवड : सहकारामध्ये मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदनदादा भोसले यांचे किसनवीर,तीनही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत. त्याबरोबरच स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीही आता मदन भोसले यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत कारखाने आणि मदनदादा या दोघांच्याही भविष्याची नौका तीराला लागणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

भाजपच्यानेत्यांची मांदियाळी सातारा-पुणे जिल्'ाच्या सरहद्दीवर खंडाळा येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या को-जन प्रकल्पाच्या उद्घाटन निमित्ताने एकत्रित येत आहे. काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असलेले मदनदादा भोसले यांच्या किसनवीर उद्योग समूहाच्या व्यासपीठावर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची उपस्थिती नक्कीच दादाप्रेमी व काँग्रेसच्या गोटात खळबळ करणारी आहे. मात्र, भाजपने किसनवीर उद्योगसमूहाच्या व्यासपीठावरून वाई-खंडाळा-महाबळेश्वर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावरच सर्जिकल स्ट्राईक केला असून, या दिग्गजांच्या उपस्थितीत किसनवीरचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचा भविष्यातील राजकीय श्रीगणेशा होणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

क्रांतिवीर किसनवीर आबा व तत्कालीन सहकाºयांनी उभ्या केलेल्या किसनवीरच्या सहकार मंदिरात कार्यक्रमानिमित्त उपस्थितीत राहणारे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. किसनवीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हातात विकासाचा कोरा चेक देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातील भविष्यातील राजकीय वादळाची पूर्व कल्पना दिली होती. म्हणूनच याची उतराई किंवा ॠणनिर्देश करण्याच्या औपचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येत असले तरी काळाच्या गर्भात लपलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्यासपीठावरून मिळणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपाची व त्यांची होणारी जवळीक राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसपक्षालाही मोठी हानी पोहोविणारी आहे. तर मदानदादांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून भाजपा लोकसभेसाठी की विधानसभेसाठी उपयोग करू शकते. आमदार मकरंद पाटील यांची पकड असलेल्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाबरोबरच जिल्'ातील अनेक मतदार संघांतील बेरजा व वजाबाक्या करणारा हा कार्यक्रम ठरणारा असून, मदनदादा भोसले लोकसभेला की विधानसभेला याचाही श्रीगणेशा खंडाळ्यातील गणेश मंदिराच्या भूमिपूजनाबरोबरच होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.प्रतापराव भोसले मदनदादांना काँग्रेसबाहेर पडू देणार?राज्याच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी नेहमीच यशवंत विचारांचे तत्त्व आणि सत्त्व जपले आहे. तर त्यांचे सुपुत्र मदनदादा भोसले हे भाजपाशी जवळीक साधत आहेत. त्यामुळे वाई तालुक्याबरोबरच जिल्'ातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रतापराव भोसले मदनदादांना काँग्रेसबाहेर जाऊ देणार नाहीत, अशी भाबडी आशा कार्यकर्त्यांना आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण