शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार यादीत नाव डावलल्याने उदयनराजे समर्थक संतप्त; राजीनाम्याचा इशारा...

By नितीन काळेल | Updated: March 14, 2024 22:14 IST

पदाधिकाऱ्यांचा सबुरीचा सल्ला: उद्या अंतिम निर्णय घेण्यात येणार

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीतही खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा मतदारसंघासाठी नाव जाहीर न झाल्याने समर्थक संतप्त झाले. याबाबत गुरुवार रात्री शासकीय विश्रामगृहात बैठक घेत राजीनामा देण्याचा इशारा दिला. मात्र, भाजपचे लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांनी शुक्रवारपर्यंत वाट पाहू व त्यानंतर आपण एकमताने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे कार्यकर्ते शांत झाले. 

याबाबत माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार हे निश्चित नाही.  अशातच भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. 

सातारा मतदारसंघ भाजपने घेऊन उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे दोन याद्यांनंतरही उदयनराजेंचे नाव जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय विश्रामगरावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते. पण, त्यांच्या वंशजांना उमेदवारी डावलली जाते हे आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर सुनील काटकर यांनी तुमची मागणी रास्त आहे. तुमचा असंतोष बरोबर आहे. कारण, सातारा जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. तरीही आपण त्यांच्या उमेदवारीसाठी एक दिवस थांबावे. कारण, गुरुवारी दिवसभरात  त्यांच्याशी अनेक वरिष्ठांनी बोलणे केलेले आहे.  त्यामुळे कोणीही हवालदिल न होता शुक्रवारी आपण एकमताने भूमिका मांडू असे स्पष्ट केले. 

भाजप जिल्हाध्यक्षांबरोबर पत्रकार परिषद  

महायुतीत अजूनही लोकसभा मतदारसंघाचे वाटप सुरू आहे. याबाबत शुक्रवारी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर  सातारा मतदारसंघाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याबरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सुनील काटकर यांनी या बैठकीत सांगितले.

टॅग्स :satara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४