पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक कास तलावाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच कास पठाराकडे वळतात. गेल्या दोन महिन्यांपासून लाखो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. सध्या फुलांचा हंगाम ओसरल्यामुळे कास पठार, तलाव, बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क बंद करण्यात आले आहे. परंतु पठाराच्या कोणत्याही गेटमधून आत गेल्यास प्रतिव्यक्ती दहा रुपये शुल्क संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून वसूल केले जाईल, अशी माहिती वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)सव्वालाख पर्यटकांची हजेरी--फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून आजअखेर एक लाख वीस हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली आहे. तसेच सुमारे २२ लाख रुपये शुल्क वसूल करण्यात आले आहे. दि. १२ पासून कास पठारवरील शुल्क वसुली बंद करण्यात येणार आहे.
फुलांच्या पर्वणीचा सूर्योदय मावळला
By admin | Updated: October 12, 2015 00:34 IST