औंध : औंध येथील श्री यमाईयात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे मंगळवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता कुस्त्यांचा फड रंगणार आहे. त्यामुळे या आखाड्यात होणाऱ्या कुस्त्यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे.प्रथम क्रमांकाची कुस्ती दीड लाखाची आहे. ही कुस्ती सुनील साळुंखे (खवासपूर) विरुद्ध नंदू आबदार (कोल्हापूर) यांच्यात होणार आहे. एक लाखाची मारुती जाधव मोतीबाग विरुद्ध बापू मंडले सोलापूर यांच्यात होणार आहे. ७५००० हजारांची माउली जमदाडे गंगावेल विरुद्ध पांडुरंग मांडवे कुमठे यांच्यात तर ५०,००० हजारांची बक्षिसासाठी रामदास पवार (पारगाव) विरुद्ध औदुंबर मासाळ व संतोष लवटे (कोल्हापूर) विरुद्ध इसाक पठाण यांच्यात टक्कर होणार आहे. याचबरोबर आणखी चुरशीच्या लढती होणार आहेत. (वार्ताहर)औंध कुस्ती स्पर्धांना मोठी परंपरा आहे. त्यामुळे या भागातील अनेक कुस्ती शौकिन आवर्जुन हजेरी लावतात.
सुनील की नंदू...कोण दाखवणार अस्मान
By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST