शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

राज्यभरातील पर्यटकांना सुंदरगडाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:23 IST

fort, sataranews, tourisam दिवाळी सुटीच्या हंगामात पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक गडावरील निसर्ग सानिध्यात होणारा सूर्यास्त पाहूनच गडावरून खाली उतरत आहेत. तालुक्यात निसर्ग पर्यटनासोबत ऐतिहासिक महत्त्व असणारा सुंदरगडही नवीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे.

ठळक मुद्देराज्यभरातील पर्यटकांना सुंदरगडाची भुरळ गर्दी वाढली : निसर्ग सौंदर्यासह ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा

प्रवीण जाधवरामापूर : दिवाळी सुटीच्या हंगामात पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. पर्यटक गडावरील निसर्ग सानिध्यात होणारा सूर्यास्त पाहूनच गडावरून खाली उतरत आहेत. तालुक्यात निसर्ग पर्यटनासोबत ऐतिहासिक महत्त्व असणारा सुंदरगडही नवीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे.पाटण येथून जवळच असलेला सुंदरगड सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. कऱ्हाड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरून पाटण शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या सुंदरगडाकडे जाता येते. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरणारा पर्यटक आणि कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येणारा पर्यटक हा आवर्जुन सुंदरगडाकडे वळत आहे. येथे येऊन सुंदरगडाच्या सुंदरतेत तो मोहून जात आहे.

गडावर आल्यावर पश्चिम महाद्वारात दर्शनी वीर हनुमान आणि दक्षिणाभिमुख गणपती आहे. सूर्योदय होत असताना किरणे गणपती मूर्तीवर येतात. तर सूर्यास्त होताना सूर्यकिरण वीर हनुमान मूर्तीवर येते. हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.काळ्या कातळात खोदलेली भव्य तलवार आकाराची विहीर येथील दुसरे महत्त्वाचे आकर्षण आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर ह्यगजलक्ष्मीह्ण कोरलेली आहे. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी ही गजलक्ष्मी तलवार विहीर सुंदरगडाचे आकर्षण आहे.सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, वसंतगड, गुणवंतगड या किल्ल्यांचे सहज दर्शन सुंदरगडावरून होते. येथून दिसणारा लालबुंद सूर्यास्त पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. सुंदरगडावर आलेला पर्यटक गडाची संपूर्ण सफर पूर्ण करूनच पर्यटनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे.अभ्यासकही होतायत आकर्षितपाटणमधील दुर्गप्रेमींकडून गडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या गडाच्या बाजूला अनेक वनौषधींची झाडे असून, दुर्गप्रेमींकडून अनेक झाडांची लागवडही करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वनौषधींचे अभ्यासकही गडाकडे आकर्षित होत आहेत.युवकच बनलेत गाईडपाटण तालुक्यातील या सुंदरगडाविषयी माहिती सांगण्यासाठी तालुक्यातीलच युवक गाईड म्हणून काम करीत आहेत. आपल्या विशेष शैलीत ते पर्यटकांसमोर गडाचा इतिहास उभा करत आहेत. त्यामुळे गडावर आलेला पर्यटक आनंदित होऊन परतत आहे.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसरtourismपर्यटन