शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारेगार, वेण्णालेक परिसरात पानांवर हिमकणांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:10 IST

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता.

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारेगारवेण्णालेक परिसरात पानांवर हिमकणांचे दर्शन

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही थंड असते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरचे तापमानही वाढत असते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता.सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सर्वच ऋतूंमध्ये महाबळेश्वर देशभरातील पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन असते.

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राचा पारा चढला असताना महाबळेश्वर मात्र गारेगार असते. होळीनंतर उन्हाचा तडाखा वाढतो. पर्यायाने महाबळेश्वरचेही तापमान वाढते. गेल्या पंधरा दिवसांत उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. परंतु असे असतानाही काल मध्यरात्री महाबळेश्वरमध्ये थंडीचा तडाखा अचानक वाढला.सकाळी येथील वेण्णा लेक परिसरातील अनेक झाडांच्या पानांवर गोठलेले दवबिंदू साचल्याचे स्थानिकांसह पर्यटकांना दिसल्यामुळे पर्यटकही खूश झाले. अनेकांनी हा नजारा मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. भल्या सकाळपासून हे फोटो परस्परांबरोबरच सोशल मीडियावरही शेअर करण्यात हे पर्यटक अग्रभागी

दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर

सर्वत्र उन्हाळी हंगामातील उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अतिशय अल्हाददायक  वातावरण अनुभवायास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात आज भल्या पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरीशुभ्र चादर ठिकठिकाणी शेती व स्ट्रॉबेरी मळ्यामधे पाहावयास मिळाली. या परिसरात ४-५ अंश  डिग्री पारा खाली उतरला होता. या निसर्गाच्या आविष्काराचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.

गेले २ दिवसापासून या नंदनवनातील सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अल्हाददायक  होते. आज सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश  डिग्री खाली उतरले होते, त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत,पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचे पाहावयास मिळाले. हिवाळ्यात अश्या प्रकारे हिमकण पाहावयास मिळत असतात मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसणे हे अत्यंत दुर्मिळ चित्रच म्हणावे लागेल. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्याची थंडी पडली होती, मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते ४-५ अंश डिग्री पेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अश्या प्रकाचे हिमकण महाबळेश्वर मध्ये पाहावयास मिळाले होते. त्याचाहि आनंद त्यावेळी स्थानीकांसह पर्यटंकांनी मनमुरादपणे लुटला होता. 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर