शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

विवाहितेची मुलासह गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या

By admin | Updated: March 13, 2016 00:59 IST

घटनेने परिसरात हळहळ

मेढा : म्हाते खुर्द (ता. जावळी) येथील संगीता चंद्रकांत दळवी या विवाहित महिलेने आपला मुलगा सर्वेश चंद्रकांत दळवी (वय ९) याच्यासह भाताच्या गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत या मायलेकरांचा मृत्यू झाल्याची माहिती मेढा पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हाते खुर्द येथे चंद्रकांत दळवी यांचे घर असून, त्यांना साहील व सर्वेश अशी दोन मुले आहेत. चंद्रकांत दळवी हे मुंबई येथे नोकरीस असतात. तर म्हाते खुर्द येथे दळवी यांची पत्नी संगीता व आई-वडील, मुले राहतात. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास संगीता या आपल्या सर्वेशला घेऊन घराबाहेर पडल्या. काही वेळानंतर संगीता यांच्या सासू-सासऱ्यांना संगीता व सर्वेश घरात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर साहील व इतरांनी सगळीकडे शोध सुरू केला. दरम्यान, म्हाते खुर्द गावातील म्हसोबाचे शिवार नावाच्या शेतात भाताची गंजी पेटल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संगीता व सर्वेश यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे आढळले. दरम्यान, ही आत्महत्या असल्याची परिसरात चर्चा असून, या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच चंद्रकांत दळवी हे मुंबईवरून गावी आले. पोलिसांनी शवविच्छेदन करून या दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)