शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : विश्वजितराजे नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 15:59 IST

तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

फलटण : फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.  आगामी काळात सर्वसामान्य शेतकरी, शेतकऱ्यांचे पाल्य व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याबाबतीत कसलीही तक्रार आली तरी त्यावर कडक पावले उचलण्यात येतील. आपल्या कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,’ असा सज्जड दम पंचायत समितीचे नूतन सभापती विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहावे. तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध राहणार आहे, असेही विश्वजितराजे नाईक- निंबाळकर यांनी स्पष्ट केले.फलटण तालुक्यामधील बहुतांश ग्रामसेवक हे नियुक्तीच्या ठिकाणी बसत नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये सांगतात की, ‘अण्णासाहेब फलटणला गेले आहेत. वास्तविक ते फलटणलासुद्धा कामासाठी आलेले नसतात. आगामी काळात अशा प्रकारे जर कोणी ग्रामसेवक कामकाज करीत असतील, तर त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.यावेळी नूतन उपसभापती संजय सोडमिसे, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, रेश्मा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घ्या...सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. त्या योजना संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वितरण करण्यात येणार आहे. ज्यांना आगामी योजनेचा लाभ घ्यायचा आहे; परंतु त्यांना प्रक्रिया माहीत नाही त्यांनासुद्धा त्यांच्या गावामध्ये येऊनच मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटण