शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘सह्यााद्री’चा ३५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस उभा

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

शेतकऱ्यातून नाराजी : नियोजनाचा अभाव; कोरेगाव दक्षिण भागात साखर कारखान्याकडून बघ्याची भूमिका...

रहिमतपूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील कार्यक्षेत्रातील सुमारे ३५० हेक्टर ऊस अजून उभा आहे. योग्य नियोजनाचा अभाव कार्यक्षेत्रात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सह्याद्री्र कारखान्याच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवून परिसरातील उमेदवारांना निवडून आणले. आमदारांनी या परिसरातील लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांना उपाध्यक्षपद दिल्याने परिसरात फार मोठा उत्साह होता. तसेच नंदकुमार पाटील व कांतीलाल पाटील हे दोन संचालकसुद्धा कार्यरत आहेत. परंतु या भागात वाठार (किरोली) व रहिमतपूर असे दोन गट आहेत. येथे त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही. वाठार गटात २५० हेक्टर तर रहिमतपूर गटात १५० हेक्टर ऊस ताडीविना अजून उभा आहे. त्यातच सभासदाच्या काही लागणीसुद्धा गेल्या नाहीत. एकरी १० ते १२ हजार रुपये ऊस तोडण्यासाठी टोळ्या मागत आहेत. तरीही ऊस जाळूनच नेण्यास सुरुवात केली आहे. पैसे दिले नाहीत तर ऊस तोडला जात नाही. आगामी पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी पैसे देवून ऊस तोडत आहेत. त्यासाठी परिसरातील संचालकांनी टोळ्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासद वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या बैठका होवून नियोजन करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबत कारखान्याच्या उपाध्यक्षांशी संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)रहिमतपूर गटातील सुमारे १०० हेक्टर ऊस शिल्लक आहे. दि. १० जूनपर्यंत ऊस संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. नोंदीचा कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवत आहोत. -विजयकुमार कदम, फिल्डमनपावसाची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. माझा स्वत:चा लागण आणि खोडवा सात एकर ऊस अजून तोडलेला नाही. असे अनेक शेतकरी आहेत. ऊसतोड टोळ्या वाढविण्याची गरज आहे. - संभाजी व्यंकटराव माने, शेतकरी रहिमतपूर.