पिंपोडे बुद्रुक : ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ती जमिनीची सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते,’ असे मत बोरगाव कृषीविज्ञान केंद्रातील शेतीविषयक कार्यक्रमाचे प्रमुख संग्राम पाटील यांनी व्यक्त व्यक्त केले आहे.
आनेवाडी (ता. वाई) येथे बोरगाव येथील कृषीविज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रमात पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ऊस पाचट ठेवणे गरजेचे आहे. यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविणे शक्य होते. तसेच खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.
यावेळी वैभव शिंदे यांच्या सेंद्रिय केळी प्रक्षेत्रावर शिवारफेरी घेण्यात आली. शिंदे यांनी मागील चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केळी पिकाचे व्यवस्थापन केलेले आहे.
शिवरफेरीला कृषीविज्ञान केंद्राचे डॉ. महेश बाबर, भूषण यादगीरवार, सागर सकटे व कृषी सहाय्यक सुजित जगताप आणि नेवसे उपस्थित होते.
फोटो ओळ : आनेवाडी (ता. वाई) येथे ऊस पाचट व्यवस्थापनविषयी संग्राम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
\\\\\\\\\\\\\\\\\