शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या शिवाराला लागलाय शेवंतीचा लळा, शेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:51 IST

Agriculture Sector Satara : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा आणि कोयना नदीचा भाग हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा या पट्यात काही शेतकरी बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या शेवंती जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये कोपर्डे हवेली, पाली, भिकेश्वर वडोली, हेळगाव या गावांचा समावेश असल्याने असेच म्हणावे लागेल ऊसाच्या शिवाराला शेवंतीचा लळा लागला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बागखर्च वजा करता सात लाखांचा नफा होण्याचा अंदाज

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा आणि कोयना नदीचा भाग हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा या पट्यात काही शेतकरी बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या शेवंती जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये कोपर्डे हवेली, पाली, भिकेश्वर वडोली, हेळगाव या गावांचा समावेश असल्याने असेच म्हणावे लागेल ऊसाच्या शिवाराला शेवंतीचा लळा लागला आहे.कोपर्डे हवेली येथील शेतकरी शुभम चव्हाण यांनी पंचवीस गुंठे क्षेत्रावर पुर्वा व्हाईट जातीच्या शेवंती फुलाची लागवड केली आहे. फुलाचे तोडे सुरू झाले आहेत. सध्या त्यांची फुले मुंबई येथील मिनाताई ठाकरे बाजार पेठेत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी त्यांना एका किलोला १२० रुपये दर भेटत आहे. चार दिवसांला दोनशे किलोचा तोडा होत आहे.

चव्हाण यांनी २७ मार्चला शेवंतीच्या आठ हजार रोपांची लागण केली. त्यासाठी पाच ट्रेलर शेणखत घातले. शेताची मशागत करून पाच फुटी सरी सोडून मलचिंग आणि टिबकचा वापर केला. वेळोवेळी औषधाच्या फवारण्या घेतले वेगवेगळ्या पध्दतीची खते दिली त्यामुळे शेवंतीचे पीक जोमदार आले. रोपांची लागण केल्यापासून सत्तर दिवसांत फुलाचे तोडे सुरू झाले यासाठी चव्हाण यांना एक लाख रुपये उत्पन्न खर्च आला आहे. एका झाडाला सुमारे एक ते सव्वा किलो फुले मिळतील असा चव्हाण यांचा अंदाज आहे. सरासरी आठ टण फुलांची विक्री केल्यास त्यांना उत्पादन खर्च वजा करता सात लाखाचा नफा होण्याची शक्यता आहे.शेवंतीच्या फुलाला दुर्गादेवी उत्सव आणि गणपती उत्सव या काळामध्ये मोठी मागणी असते. दोन वर्षांचा आनुभव लक्षात घेता एका किलोला दोनशे रूपयेच्या पुढे दर भेटतो.२५ गुंठे क्षेत्रावर आठ हजार रोपांची लागण, एका किलोचा दर सध्या १२० रुपये आठवड्यात दोन तोडे एका तोड्याला दोनशे किलो फुले, चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहेत. उत्पादन खर्च एक लाख रुपये... तर खर्च वजा करता सात लाखाचा नफा दुर्गादेवी गणपती उत्सव या काळात दर वाढतात.

माझे मित्र संजय चव्हाण आणि मी आम्ही टोमॅटोची शेती करण्या ऐवजी शेवंतीच्या फुलाची लागवड केली आहे. दर चांगला भेटत असून चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहे. खर्च जाऊन सात लाखाचा नफा मिळेल.- शुभम चव्हाण,शेतकरी कोपर्डे हवेली.०३कोपर्डे हवेलीकोपर्डे हवेली येथील शुभम चव्हाण यांच्या शेतात पिकवलेली फुले बाजारपेठेत निघाली आहेत. (छाया : शंकर पोळ)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरKaradकराड