शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करुया

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

जिल्हाधिकारी : दुष्काळावर मात करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन

सातारा : ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे प्रातांधिकारी असणार आहेत. सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे, त्याचप्रमाणे पीकपद्धतीत बदल करावे लागतील. यासाठी तुषार तसेच ठिबक सिंचनपद्धती राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागेल. तर काही ठिकाणी पाण्याच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.’ ‘प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर समिती गठित करून त्यामध्ये साखर कारखाने, सूतगिरणी, बाजार समिती, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक संघटना, सेवाभावी मंडळे आदींचा समावेश करावा,’ असेही मुदगल म्हणाले. (प्रतिनिधी)ही कामे लागतील मार्गी...बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, गाळ काढण्यासाठी मोठी मोहीम, हातपंपाच्या दुरुस्ती, पाण्याचा ताळेबंद राखणे, आपल्या प्रियजनांच्या नावाने स्मृतिवन निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करावे. हिरवी टेकडी, वृक्षारोपण, नाला खोलीकरण, सरळीकरण, माथा ते पायथा सीसीटी आदी पाणलोट विकासाचे कामे करावयाची आहेत. ठिकठिकाणी जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, शेततळ्याची दुरुस्ती, नाले, ओढे जोडणे आदी कामे करावयाची आहेत.