लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगाव येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाचक उपनिरीक्षक भरत नाळे यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल सर्वोच्च राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी हे पदक मिळणारे ते एकमेव ठरले आहेत.
कोरेगावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नाळे हे असून, महाविद्यालयीन शिक्षणानंतर १९८६ साली सातारा पोलीस दलात शिपाई म्हणून ते भरती झाले. त्यांनी पोलीस मुख्यालय, सातारा शहर, कऱ्हाड शहर, सातारा तालुका, पाचगणी पोलीस ठाण्यात हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली. पोलीस मुख्यालयातील वाचक शाखेत त्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे. २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षेद्वारे त्यांची उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. आजवरच्या सेवा काळात त्यांनी चोरी, दरोडे अशा अनेक गुन्ह्यांचा कौशल्याने तपास केला असून, कुख्यात गुंडांच्याही मुसक्या आवळत त्यांचा बंदोबस्त केला आहे. आजवरच्या सेवा काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रथम प्राधान्य दिले. २०१५ साली पोलीस महासंचालक यांचे त्यांना सन्मानचिन्ह मिळाले. तर आतापर्यंत ७३० रिवॉर्डस मिळाली आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र साळुंखे, गणेश किंद्रे, निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक निरीक्षक संतोष साळुंखे, घनश्याम बल्लाळ, विश्वजित घोडके, स्वप्निल घोंगडे, उपनिरीक्षक विशाल कदम, प्रमोद सावंत यांच्यासह उपविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हाफ फोटो
२५भरत नाळे