शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंगणवाडीतील चिमुकल्यांना ‘स्टडी टेबल’

By admin | Updated: October 21, 2016 23:34 IST

‘रोजगार फाउंडेशन’चा पुढाकार : येणके-पोतलेच्या अंगणवाड्यांचे रूप पालटतंय; ‘आयएसओ’ मानांकनाच्या दिशेने पाऊल

 कऱ्हाड : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे अन् ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या ओस पडताहेत की काय? असा प्रश्न पडलाय. ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या इमारती, स्कूलबस सारं खुणवातंय; पण गावातील शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत विचार कोण करणार? ‘रोजगार फाउंडेशन’चे प्रमुख हेमंत पाटील यांनी मात्र हा विचार कृतीतून दाखवून दिलाय. म्हणून तर येणके-पोतलेच्या पाच अंगणवाड्यांचे रूप पालटताना दिसत आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी अभ्यासपूर्ण ‘स्टडी टेबल’ देण्यात आले असून या माध्यमातून चिमुकले अध्यापणाचे धडे गिरवत आहेत. कऱ्हाड तालुक्याच्या राजकारण, समाजकारणाच्या पटलावर नेहमीच येणके अन् पोतले ही गावे चर्चेत असतात. येथे प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती तर जुन्या आठवणींना उजाळा देतात. प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारी जीवन शिक्षण विद्यामंदिरे आता इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाचे आकर्षण वाढल्याने ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यांच्या कारणांचा शोध घेतला तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या सुख सुविधा जास्त आहेत. मुलांच्या भवितव्याचा विचार करीत पालक त्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. परिणामी गावच्या अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळते. हे चित्र बदलायचे असेल तर अंगणवाड्या, शाळांच्या इमारती चांगल्या व सोयींनियुक्त हव्यात हे ओळखून हेमंत पाटील यांनी येणके व पोतले या दोन गावांतील अंगणवाड्या अद्ययावत करण्याचा संकल्प केला. पंतोजीमळा, पाटीलमळा, जुने गावठाण या पोतलेतील तीन अंगणवाड्या व येणके येथील दोन अंगणवाड्या त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्या. चुलते ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील व भाऊ उदय पाटील यांच्या मदतीने त्यांनी सुमारे शंभर स्टडी टेबल या अंगणवाड्यांना दिले आहेत. मुलांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य पुरविले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पालकांचा ओढा या गावातील अंगणवाड्यांकडे वाढायला हरकत नाही. (प्रतिनिधी) ‘स्टडी टेबल’वरच आता एबीसीडीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाटी आणि पेन्सील घेऊन अंगणवाडीतील वर्गातील फरशीवरच बसविले जाते. त्यांनाही बसण्यासाठी अंगणवाडीमध्ये स्टडी टेबल असणे गरजेचे आहे. हे ओळखून पोतले येथील अंगणवाडी क्रमांक २०१ मध्ये आकर्षक पद्धतीची छान-छान स्टडी टेबल देण्यात आले आहेत. त्यावरती एबीसीडीसह आवश्यक माहितीही आहे.