शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना हवी सत्र परीक्षा : अभ्यासाशिवाय अन्य काहीच करता येत नसल्याची काहींची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:43 IST

सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक

ठळक मुद्देमहाविद्यालयीन कॅम्पस आग्रही

भोलेनाथ केवटे ।सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक पध्दतीच ठेवावी, असा आग्रह महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये दिसून येत आहे.

सध्या प्रचलित असणाऱ्या, मूल्यमापनासाठी सतत वापरल्या जाणाºया पद्धती म्हणजे लेखी परीक्षा. या घेण्याच्या पद्धती म्हणजे सत्रपद्धती आणि वार्षिक पद्धती. अनेक उत्तम शैक्षणिक संस्था, परदेशी विद्यापीठे तसेच स्थानिक विद्यापीठे या सत्र पद्धतीचा अवलंब करतात. वर्षभरात सत्र पद्धतीने होणाºया दोन परीक्षेच्या नियोजनात शिक्षकांचा किमान ३० टक्क्यांहून अधिक वेळ जातो.

नागपूर येथे झालेल्या परिषदेत आणि शिवाजी विद्यापीठात झालेल्या मीटिंगमध्येही यासंदर्भात काही कुलगुरुंनी या सत्र पद्धतीचा मुद्दा मांडला. सत्र पद्धत सध्या उपयुक्त ठरत नाही. विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थीच बनत चालला आहे, त्याला इतर कला-कौशल्यासाठी वेळ मिळत नाही, असे काही मुद्दे या परिषदेत मांडले गेले होते.या सत्रपद्धतीमुळे विद्यार्थ्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळही मिळत नसल्याचे मत काही शिक्षकांनी नोंदवले. सत्र पद्धत बरी का वार्षिक? या संभ्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.वर्षभराचे अध्यापन कसेबसे पूर्णवर्षभरात किमान १८० दिवस अध्ययन, अध्यापन झालेच पाहिजे. प्रत्यक्षात ३६५ दिवसांचा हिशोब पाहिला तर उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी, इतर सण, उत्सव, सार्वजनिक सुट्या आणि वर्षाचे रविवार यांची अंदाजे बेरीज १३५ दिवसतरी होते. ३६५ वजा १३५ बरोबर २३० दिवस आणि त्यामध्ये दोन्ही सत्रांत किमान ४०-४० दिवस (प्रत्यक्षात दोन महिने किंवा जास्त) आणि कसेबसे १५० दिवस प्रत्यक्ष कामकाजासाठी उरतात. त्यामध्ये पुन्हा गॅदरिंग, खेळांचे सामने आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा आदी कार्यक्रम याच दिवसांत असतात.सत्र परीक्षा फायदे :१. विद्यार्थी नियमित हजर राहतात.१. विद्यार्थी नियमित अभ्यास करतात.१. वर्षातून दोन परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यावर अभ्यासाचा मानसिक ताण येत नाही.१. परीक्षांचे नियोजन आटोपशीरहोते.सत्र परीक्षा तोटे :१. अभ्यासासाठी वेळ मिळत नाही.१. वेळखाऊ प्रक्रिया आहे.१. इतर कौशल्यांसाठी वेळ देता येत नाही.१. अन्य जबाबदाºयांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. 

सत्र पद्धतीमुळे अध्यापनाचे काम आटोक्यात येते. मात्र मुलांना इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येत नाही. यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो.- प्रा. डॉ. ए. एस. पाटीलसत्र पद्धत ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जे शिकविणं अपेक्षित असतं त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. वेळ अपुरा असल्यामुळे अभ्यासक्रम शिकविताना अनेक अडचणी येतात.- प्रा. डॉ. युन्नूस शेखसत्र पद्धतीमुळे मला अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबींना वेळ देता येत नाही. वर्षातून एकदा परीक्षा घेतल्यास अभ्यासालाही वेळ मिळेल आणि मला खेळातही भाग घेता येईल.- परशुराम कांबळे, विद्यार्थीवार्षिक परीक्षेपेक्षा सत्र पद्धत खूप चांगली आहे. कारण, अभ्यास चांगला होतो. वार्षिक परीक्षेमुळे वर्षभर अभ्यास करता येत नाही आणि एकदमच अभ्यासाचा ताण येतो.- अश्विनी भोसले, विद्यार्थिनी

टॅग्स :examपरीक्षाSatara areaसातारा परिसर