शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बोलू लागले ‘जय हिंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:30 IST

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शिक्षकांनी हजेरी घेतली की विद्यार्थ्यांच्या तोंडून एस सर.. येस मॅडम अथवा हजर असे शब्द आजही वापरले जातात. मात्र, यापुढे हे शब्द न उच्चारण्याचा निर्णय जिल्ह्यातील दोन शाळांनी घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करीत या शाळेतील विद्यार्थी आता हजेरी घेतल्यानंतर एस सर.. एस मॅडम ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शिक्षकांनी हजेरी घेतली की विद्यार्थ्यांच्या तोंडून एस सर.. येस मॅडम अथवा हजर असे शब्द आजही वापरले जातात. मात्र, यापुढे हे शब्द न उच्चारण्याचा निर्णय जिल्ह्यातील दोन शाळांनी घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करीत या शाळेतील विद्यार्थी आता हजेरी घेतल्यानंतर एस सर.. एस मॅडम ऐवजी ‘जयहिंद’ बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच अंमलबजावणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांमध्ये देशभावना वाढीस लागावी, यासाठी मध्यप्रदेश सरकारने नुकताच अनोखा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सकाळी शिक्षकांनी हजेरी घेतली की एस सर.. एस मॅडम ऐवजी विद्यार्थी जयहिंद बोलू लागले आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांमधूनही स्वागत करण्यात आले. त्याच धरतीवर आता वाई तालुक्यातील अनपटवाडी व जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनीही विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि देशाभिमान वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या ‘जयहिंद फाउंडेशन’कडून प्रेरणा घेऊन अनपटवाडी शाळेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच या देशभक्तीपर उपक्रमाची माहिती देण्यात आली. यानंतर शिक्षकांनी घेतलेल्या हजेरीनंतर विद्यार्थी ‘जय हिंद’ बोलू लागले. अनपटवाडीबरोबरच जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी प्राथमिक शाळेतही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पालकांमधूनही कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक अनिल पिसाळ, रेणुका काळे, उमेश मोरे तसेच इतर शिक्षक वृंद यांनी पुढाकार घेतला आहे.