सातारा : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्काबाबत जिल्हा परिषदेत बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शासनाची भूमिका मांडतानाच शाळांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, अधीक्षक हेमंत खाडे, शाळा व पालक प्रतिनिधी आणि ग्राहक पंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्काबाबत पालक आणि ग्राहक पंचायतीने तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही बैठक घेण्यात आली. यामध्ये पालक आणि शाळा प्रतिनिधींनी आपापली बाजू मांडली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी याबाबतची शासन भूमिका स्पष्ट केली.