शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

विद्यार्थ्याकडे आढळले पिस्तूल

By admin | Updated: October 16, 2015 23:24 IST

कऱ्हाडात कारवाई : पिस्तूलसह जिवंत काडतुसे, मॅगझिन हस्तगत

कऱ्हाड : महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत केली. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली. संबंधित मुलाकडून विक्रीच्या उद्देशाने आणलेले पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथील महाविद्यालय परिसरात एकजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती शुक्रवारी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. घनवट यांनी या माहितीची खातरजमा करून पथकाला सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी सकाळीच महाविद्यालय परिसरात दाखल झाले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयटीआय चौकातील लक्ष्मी भवन हॉटेलसमोर हे पथक दबा धरून बसले. त्यावेळी एक अल्पवयीन मुलगा रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलीस पथकाने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने आणलेले सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल, सुमारे एक हजार ५०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे, एक हजार रुपये किमतीचा मोबाईल, तीन हजार ५०० रुपये किमतीचे एक आयताकृती मॅगझिन असा सुमारे ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून विनापरवाना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी) मूळचा बहुले गावचा !पोलिसांनी ताब्यात घेतलेला संबंधित मुलगा विद्यानगर येथील एका महाविद्यालयात शास्त्र शाखेमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. तो कऱ्हाड तालुक्यातील बहुले गावचा असून, गत काही दिवसांपासून ते पिस्तूल त्याच्याकडे होते. काही मुलांसमोर हातात पिस्तूल घेऊन ‘शायनिंग’ करण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे.