शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बनावट नोटा बाळगणाऱ्या टोळीला अटक

By admin | Updated: November 30, 2014 00:31 IST

एलसीबीची कारवाई : साडेपाच लाखांचे चलन, बांग्लादेशच्या भागातून आणल्याचा संशय

सातारा : बनावट नोटा चालविण्यासाठी साताऱ्यात फिरणाऱ्या पाचजणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. त्यांच्याकडून पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे बनावट चालन जप्त करण्यात आले आहे. त्यांनी या नोटा बांग्लादेशच्या भागातून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना साताऱ्यात राधिका रस्त्यावर चार ते पाच जण बनावट नोटा चालवित असल्याचे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक घनवट व कर्मचारी संबंधित ठिकाणी गेले. त्यावेळी तेथील एका गॅस एजन्सीजच्या समोर पाचजण संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्याकडे पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचे बनावट चलन आढळून आले. रणजित जितेंद्र बिश्वास (वय ३२, रा. कमछलबेरीया, जि. नदिया पश्चिम बंगाल. सध्या रा. नेरे, हिंजवडी, पुणे), खंडाप्पा बळीराम तुगावे (वय २९, रा. मंगळूर, ता. औसा, जि. लातूर. सध्या रा. नेरे-दत्तवाडी, हिंजवडी पुणे), राहुल अण्णाराव सुरवसे (वय २४, रा. राणी अंकुलगा, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. सध्या रा. नेरे, दत्तवाडी पुणे), ज्ञानेश्वर भानुदास कसबे (वय २३, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर. सध्या रा. नेरे-दत्तवाडी पुणे) आणि अनिकेत मनोहर सूर्यवंशी (वय १९, रा. हेळंब, जि. लातूर सध्या रा. वडगावशेरी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, कुमार घाडगे, सहायक फौजदार प्रताप जाधव, पृथ्वीराज घोरपडे, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, संजय पवार, विजय शिर्के, संजय शिंदे, दीपक मोरे, उत्तम दबडे, काका कदम, विजय कांबळे, शरद बेबले, संजय वाघ, विजय सावंत, कांतिलाल नवघणे, नितीन भोसले, महेश शिंदे, रामचंद्र गुरव, मुबीन मुलाणी, प्रवीण शिंदे, यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)