शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पदांचा संघर्ष अडकला ‘यात्रेत’ !

By admin | Updated: March 31, 2017 23:01 IST

जिल्ह्यातील सारेच नेते विदर्भात : सभाप्तिपदांची घोषणा अमरावतीतून केली जाणार

सातारा : ‘जिल्हा परिषदेतील सभापती पदांच्या नावाची घोषणा शनिवारी सकाळी १० वाजता केली जाणार आहे. कारण जिह्यातील राष्ट्रवादीचे सारेच नेते विदर्भातील संघर्ष यात्रेत अडकले आहेत. अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे दूरध्वनीवरून नावांची घोषणा करतील,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली. जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी जितकी उत्सुकता होती, तितकीच सभापती निवडीचीही उत्सुकता ताणली गेली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ६४ पैकी ४० सदस्य निवडून आले आहेत. सभापती निवडी १ एप्रिल रोजी आहेत. २गुरुवारीही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते तालुक्यांचा ‘बॅलन्स’ कसा साधतात याची उत्सुकता आहे.सर्व आमदार मंडळी काही दिवसांपासून चंद्रपूर येथून निघालेल्या संघर्ष यात्रेत सहभागी झाले असल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. काहींनी सुरुवातीला नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वजण संघर्ष यात्रेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर फोनाफोनी बंद झाली. जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण या चार समित्यांचे सभापती निवडीच्या हालचाली सध्या गतिमान आहेत. महिला व बालकल्याण समितीवर दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा भारती पोळ यांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींचे एकमत झाले आहे. परंतु इतर तीन समित्यांसाठी वाई, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण या मतदार संघांतील आमदारांनी जोर लावला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या मंगळवारी जिल्ह्यातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली होती. १२ सदस्यांना आपण सभापतिपदांवर संधी देऊ शकतो, याचा पुनरुच्चार आमदार पवार यांनी या बैठकीत केला होता. फलटणला अध्यक्षपद, सातारा-जावळीला उपाध्यक्षपद मिळाले असल्याने या दोन तालुक्यांतून नेत्यांचा आग्रह थांबला आहे. माण तालुक्यालाही सभापतिपद मिळणार आहे. मात्र, कऱ्हाड, वाई, कोरेगाव, पाटण या मतदार संघांनाही संधी देण्यासाठी आमदार मंडळी या बैठकीत आग्रही राहिले होते. शनिवारी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)