शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीवरील पूल दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती 

By नितीन काळेल | Updated: June 16, 2025 19:38 IST

धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणी खबरदारी 

नितीन काळेलसातारा : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पर्यटनस्थळासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना युद्धपातळीवर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणीही खबरदारी घेण्याबाबत सूचना केलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात दिली.सातारा शहराजवळील कोडोली जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी दुर्घटना घडली. यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुंडमळा येथील पूल जुना होता. तो रहदारीस प्रतिबंधित होता. तसेच सुटी असल्याने या पुलावर अधिकचा भार पडला. त्यामुळे पूल पडला ही वस्तुस्थिती आहे. आता यामधील जखमींवर चांगले उपचार व्हावेत यासाठी प्राधान्य देत आहोत. त्याचबरोबर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत सूचना करण्यात आलेली आहे.राज्यात मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यातून अनेक शाळांनी बक्षिसे मिळविली. शाळा डिजिटल झाल्या असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस होता. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांत ऊर्जा, प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल.