शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी अन् साविआत ‘शिटी’साठी जोरदार संघर्ष

By admin | Updated: February 7, 2017 23:08 IST

आठ अर्ज बाद : सातारा तालुक्यातून २२८ उमेदवार रिंगणात

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सातारा तालुक्यात अर्ज दाखल केलेल्या २८८ उमेदवारांपैकी ८ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. आता जिल्हा परिषदेसाठी ८० उमेदवार तर पंचायत समितीसाठी १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. दरम्यान, सातारा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीत ‘शिटी’ चिन्हासाठी संघर्ष निर्माण झाला आहे.तासगाव गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार माधवी गवळी यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या जागी अपक्ष उमेदवार रेश्मा प्रवीण बोभाटे यांना पुरस्कृत म्हणून निवडले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. सातारा तालुक्यातून दाखल झालेल्या २८८ उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली. छाननीसाठी तालुक्यातून उमेदवार, सूचक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गोडोली गटातून सुजाता पाटोळे यांच्या अर्जावर सही नसल्याने त्यांचा जिल्हा परिषदेच्या गटासाठी असलेला एकमेव अर्ज अवैध ठरला. तासगाव गणातून रेखा कांबळे यांचा अर्ज शपथपत्रावर सही नसल्याने अवैध ठरला. माधवी गवळी यांचा अर्ज जातपडताळणी प्रस्तावाची पोच नसल्याने अवैध ठरला. संभाजीनगर (कोडोली) गणात प्रिती पाटील यांचा अर्ज जातपडताळणीची पोच नसल्याने अवैध ठरला. दरे खुर्द गणात सुधीर पवार यांनी मूळ जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. शेंद्रे गणात नलिनी पवार यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र पोच न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. नागठाणे गणात जयश्री दळवी यांचा अर्ज जातपडताळणी प्रस्तावाची पोच नसल्याने अवैध ठरला. (प्रतिनिधी)