शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:02 IST

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारपासून पाऊस होत असून, गुरुवारीही अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली, तर धरण परिसरातही पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात १६३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे आनंदाचे वातावरण असतानाच मध्येच पावसाने काही दिवस दडी मारली. यामुळे ...

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारपासून पाऊस होत असून, गुरुवारीही अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली, तर धरण परिसरातही पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात १६३.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे आनंदाचे वातावरण असतानाच मध्येच पावसाने काही दिवस दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांपुढे पेरणीचा प्रश्न निर्माण झाला. पाऊस होणार की नाही, या चिंतेत असतानाच बुधवारपासून पाऊस सुरू झाला आहे. पूर्व भागातील फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गुरुवारीही माण तालुक्यातील अनेक गावांत हजेरी लावली. सर्वाधिक दहिवडी मंडलात १५ मिलीमीटर पाऊसझाला. तसेच वॉटर कप स्पर्धेंतर्गतकाम झालेल्या ठिकाणीही पाणीसाठा झाला आहे. खटाव तालुक्यांतील औंध परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला बुधवारी रात्रीच्या सुमारास पावसाने झोडपले.यामुळे ओढे भरून वाहू लागले आहेत. गुरुवारीही येथे पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात पाऊस झाल्याने पिकांचे पाणी वाचले आहे. फलटण तालुक्यातील आदर्की भागातही सलग दुसºया दिवशी पाऊस झाला.सातारा शहरातही हजेरीसातारा शहरासह परिसरात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. यामुळे सर्वत्र पाणी दिसत आहे. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडला.