शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी चालक संपावर; बाहेरचे रोजंदार कामावर!--६० टन कचºयाची विल्हेवाट :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नगरपालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असूनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तब्बल ६० टन ...

ठळक मुद्देकर्मचाºयांचे उपोषण दुसºया दिवशीही सुरूचतोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नगरपालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असूनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तब्बल ६० टन कचरा गोळा केला.

सातारा शहरातील चाळीस वॉर्डातून ४२ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. दिवसभरात तब्बल ७० ते ७५ टन कचरा गोळा करून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या वतीने घंटागाडीसाठी नव्याने राबविण्यात येणाºया ई-टेंडर पद्धतीला अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने विरोध दर्शविला असून, हा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून (दि. २८) पालिकेत उपोषण सुरू केले आहे.

शुक्रवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने व सर्वच घंटागाड्यांची चाके थांबल्याने शहरात साचणारा कचरा उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर तोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने शहरातील जागो-जोगी साचलेला कचरा गोळा करून त्याची सोनगाव डेपोत विल्हेवाट लावली. दिवसभरात तब्बल ६० टन कचरा गोळा करण्यात आला.पालिकेच्या आवारात घंटागाड्या उभ्याघंटागाडी संघटनेच्या वतीने गुरुवारी पालिकेच्या आवारात घंटागाड्या उभ्या करून उपोषण सुरू करण्यात आले. शुक्रवारी दुसºया दिवशीही बहुतांश घंटागाड्या पालिकेच्या आवारातच उभ्या होत्या.७० कचरा वेचकांची मदतसोनगाव कचरा डेपोत साचणाºया कचºयातून प्लास्टिक, लोखंड व इतर भंगाराचे साहित्य गोळा केले जाते. जवळपास ७० कचरावेचक हे काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने या सर्व कचरावेचकांची मदत घेऊन शहरातील कचरा गोळा करण्यात आला.... चौकाचौकात कचरा ‘कोंडी’शुक्रवारी सकाळी वॉर्डामध्ये घंटागाडी न आल्याने बहुतांश गृहिणींनी साचलेला कचरा कुंडीत टाकला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या. शहरात जवळपास ७५ कचरा कुंड्या असून, पालिकेच्या वतीने कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून सर्व कुंड्या रिकाम्या करण्यात आल्या.