शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गावोगावच्या रस्त्यांवर फिरतं डान्स बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 23:55 IST

नियमांची पालयमल्ली : मद्यप्राशन केलेल्या तरुणांचा डीजेच्या तालावर धिंगाणा; ध्वनिप्रदूषणानं बसताहेत सामान्यांच्या कानठळया

परळी : राज्य शासनाने एका बाजूला डान्सबारला बंदी घातली आहे. मात्र, सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात परळी खोऱ्यात विविध सण, समारंभ यात्रांच्या निमित्ताने वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बी ध्वनीच्या तालावर मद्यप्राशन केलेल्या तरुणाईचा ‘फिरता डान्स बार’ कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमर्यादित डेसिबल आवाजाची ‘डॉल्बी’ सारे नियम धुडकावून ठिकठिकाणी जनसामान्यांना वेठीस धरत आहे.सध्या सर्वत्र वाढदिवसांपासून ते विविध प्रकारचे सण, उत्सव, समारंभ, यात्रा मिरवणूक, विजयोत्सव अशा अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून लक्षवेधी अशी कमालीचे ध्वनिप्रदूषण करणारी डॉल्बी सिस्टीम सध्या सर्रास वापरली जात आहे. ठेक्यावरची गाणी मद्यप्राशन केलेली तरुणाई तालावर; पण विभत्स वेडीवाकडी नृत्य करणारी युवा पिढी वाढविलेला डॉल्बीचा आवाज आजूबाजूंच्या खिडक्या, दारे अशा हलक्या वस्तू ते अगदी भिंतीपर्यंत आवाजाने वाढणारी घरघर असे दृष्य सर्रास परळी खोऱ्यासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिसत आहे.राज्य शासनाने सर्व ठिकाणचे चौकटीच्या आतले सर्व ‘डान्स बार’ बंद केले आहेत. डान्सबार बंदी झाली आणि आता त्या डान्स बारमधून बाहेर पडलेल्या काही तरुणी गावोगावच्या यात्रामधून कार्यक्रमातून तरुणांना खुणवत उघड्यावर नाचगाणी सादर करत आहेत. डॉल्बीच्या तालावर मद्याचा डोस घेतलेली युवा पिढी रात्री उशिरापर्यंत विभत्स नृत्य करत आहेत. ना डॉल्बीच्या आवाजावर ना युवा पिढीच्या या वर्तणुकीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. जनसामान्य मात्र मोठ्या कर्णकर्कशऽऽ व हुद्याची धडपड वाढेपर्यंतच्या आवाजाने त्रासून गेले आहेत. काही ठिकाणी बारबाला नसतात; पण डॉल्बीच्या अमर्याद भन्नाट आवाजावर ‘टाकून’ असणारी अश्लील हावभाव करणारी, नृत्याचा-तालसुरांचा कुठेही लवलेश नसणारी तरुणाई पाहून समाजाचे देशाचे भावी आधारस्तंभ हेच का? असा प्रश्न समाजातील जाणकरांमधून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)पुढे बारबाला मागे टाकाऊ तरुणाईसध्या परळी खोऱ्यासह इतर ठिकाणी यात्रा-जत्रांच्या व लग्नानंतरच्या रात्रीच्या वरातीत बारबाला आणल्या जात आहेत. असाच प्रकार परळी भागात घडला असून, याची सर्वत्र चर्चा होत आहे. डॉल्बी, बारबाला अन् टाकून असणारी टाकाऊ तरुणाई समाजस्वास्थ्य बिघडून टाकत आहे. आक्रमक युवा पिढीपुढे बोलायचे कोणी आणि पोलीस अथवा सक्षम यंत्रणादेखील या विषयावर मूग गिळून कशी गप्प बसते, यावर प्रश्न उपस्थित होत आहे.कायद्याचे होतेच उल्लंघनवास्तविक कायद्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७०, वाणिज्य क्षेत्रासाठी ६५ व ५५ निवासी क्षेत्रासाठी ५५ व ४५ आणि शांतता झोनमध्ये दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी ध्वनिमर्यादा सक्तीची असली तरी निवासी व शांतता क्षेत्रांमध्ये या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याची वारंवार तक्रारी होत आहेत.