पिंपोडे बुद्रुक : थंडीचे अभाव आणि झालेला आवकाळी पाऊस यामुळे बुद्रुक परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील या बदलांचा पिकांवर परिणाम झाला असून करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर झाल्यामुळे फलधारणा मंदावली आहे.गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कोरेगावच्या उत्तर भागात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जात आहे. सुुरवातीच्या काळात चौधरवाडी, सर्कलवाडी या दोन गावांमध्ये स्ट्रॉबेरी पिकली जात आहे. आता वाघोली, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव, सोनके, पिंपोडे बुद्रुक येथील शेतकरीही या पिकाकडे वळल्याचे दिसून येते. टोमॅटो, ढोबळी, मिरची, वाटाणा, पावटा या कमी कालावधीच्या बागायती पिकांना स्ट्रॉबेरीला चांगला पर्याय म्हणून पुढे आला. साहजिकच दुष्काळी परिस्थितीत द्राक्ष या भांडवली पिकासाठी एक उत्तम पर्याय म्हणून शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दिसू लागला. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केलेली ‘मदरप्लांट’ची रोपे ऐन बहरात असताना आॅगस्ट महिन्यात वळिवाचा मोठा पाऊस झाला आणि तेव्हापासूनच या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. खैऱ्या आणि करपा रोगाने शेतकरी मेटाकुटीस आला. भांडवली गुंतवणूक केलेल्या अनेक शेतकऱ्यांची रोपे करपून गेली. याचा जास्त फटका स्वीट चार्ली या जातीच्या रोपांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांची गुंतवणक वाया गेली. रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाग औषधे वापरावी लागत आहेत. या औषधांच्या किंमतीवरही शासनाचे निर्बंध नसल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढले आहे. उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली असल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. पिकांचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागला आहे. (वार्ताहर)थंडीतला पाऊस ठरला धोकादायक १४ ते १६ नोव्हेंबर या दरम्यान अवकाळी पाऊस झाला. ऐन थंडीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने फूल आणि फळांची कूज वाढली. सध्या मार्गशिर्ष महिना असून थंडीचा विशेष मागमूस नाही. दिवसभर कडक ऊन आणि रात्री थोडीफार थंउी अशा विचित्र वातावरणामुळे पिकाची फलधारणा क्षमता कमी झाली. आलेल्या फळांची पूर्ण वाढ होत नसल्याने बाजारपेठेत त्यास मागणीही कमी होत असून व्यापारी कमी किंमतीने माल खरेदी करत आहेत. सध्या चांगल्या स्ट्रॉबेरीला १५० रुपये तर दुय्यम प्रतीच्या स्ट्रॉबेरीला १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.औषधे, खते, मजुरी, पॅकिंग साहित्य या सगळ्याचा विचार करता एकरी तीन लाख रुपये खर्च होतो. यंदा घातलेले भांडवलसुद्धा परत मिळेल याची नाही, याची शंका आहे. कर्जफेड कशी करायची ही याची चिंता आहे. विजय सरकाळे, स्ट्रॉबेरी उत्पादक, सर्कलवाडी
स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक संकटात
By admin | Updated: December 10, 2014 23:58 IST