शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीची आवक वाढली; दर मात्र उतरले

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

शेतकरी आर्थिक अडचणीत : केलेला खर्चही निघेनासा झाला; वाई परिसरात अधिक प्रमाणात लागवड

संजीव वरे--वाई--अलीकडच्या काळात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणारे व वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची मागणी असलेल्या ‘स्ट्रॉबेरी’ पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. असे असलेतरी सध्या स्ट्रॉबेरी फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, बाजारपेठेत त्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात वाई व परिसरात कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. या भागातील शेती सुपीक व चांगला पाऊस पडत असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ‘स्ट्रॉबेरी’च्या मदरप्लॉटपासून नवीन रोपेही तयार केली जातात. त्याची लागवड महाबळेश्वर व अनेक तालुक्यांत केली जाते. याचे मदरप्लॉट परदेशातून येत असल्यामुळे त्याची किंमत मोठी असते. तसेच त्याची लागवड वाफ्यावर ठिबक स्प्रिंक्लर फळासाठी मल्चिंग पेपर टाकून केली जाते. या सर्वासाठी खते व औषधे यावर मोठा आर्थिक खर्च होतो. तो बँकाचे कर्ज काढून करावा लागतो.. यावर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने डोंगर दरीतील पाण्याचे झरे व प्रवाह आटले आहेत. विहिरींच्याही पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे व पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.त्यातच स्ट्रॉबेरीच्या फळाची आवक वाढली आहे. परंतु, त्याचे दर किलोला १२० ते १४० रुपयांपर्यंत आली आले आहेत. त्यामुळे झालेला खर्च व उत्पादन याचा मेळ बसणे शेतकऱ्यांपुढे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अजूनही पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विकत घेतलेली रोपे, त्यासाठी लागणारी खते, औषधे, पाणी नियोजनासाठी वापरलेले ठिबक व स्प्रिंक्लर, फळे व्यवस्थित राहण्यासाठी घातलेला मल्चिंग पेपर यांचा खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच दुष्काळामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही एखादा पाऊस पडेल, या अपेक्षेवर शेतकरी वर्ग आहे. अडचणी वाढल्या; हप्ते भरणे अवघडसध्या हवामानात होणारे बदल, वाढते उष्णतेचे प्रमाण, निर्माण होणारी पाणीटंचाई यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आला आहे. त्यातच स्ट्रॉबेरी लागवडीसाठी केलेला खर्च व बाजारपेठेतील कमी झालेला दर यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सोसायट्या, बँकेतून घेतलेल्या पीक कर्जाचे हप्ते भरणेही अवघड झाले आहे. यावर्षी बाजारपेठेत ‘स्ट्रॉबेरी’ची मोठी आवक वाढली आहे. त्यामुळे त्याचे दर लवकर खाली येत आहेत. एकरी झालेला खर्च व उत्पन्नातून मिळणारे पैसे याचा ताळमेळ बसवणे अवघड होणार आहे. शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने काही शेतकऱ्यांची रोपे अजूनही गिऱ्हाईकाविना पडून आहेत. त्यातही त्यांचे मोठे भांडवल गुंतलेले आहे. -सीताराम वाडकर, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी