शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

थोरांची गाथा पाचशे व्याख्यानांतून प्रकट --  सागर पवार यांचे राज्यभर चाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 17:00 IST

भावी भाषा, भारदस्त आवाज, आशयाला अनुरूप स्वनिर्मिती तसेच इतिहासाला  वर्तमानाची दिलेली जोड यामुळे सागर पवार यांचे चाहते महाराष्ट्रभर विस्तारत आहेत.

ठळक मुद्देनिगुडमाळच्या गुरुजींचा उपक्रम

लक्ष्मण गोरे ।बामणोली : आपल्या प्रभावी व्याख्यानातून शिक्षकाचा थोर व्यक्तींविषयी समाजप्रबोधनाचा ध्यास... महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक व विचारवंताची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपले विचार प्रभावीपणे समाजाच्या तळागाळात पोहोचवले.या संत महात्म्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधनाचा वसा प्रभावी वक्ते सागर चंद्रकांत पवार यांनी घेतला आहे. सागर पवार यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील.  त्यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली आहे. ते सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निगुडमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकी पेशाबरोबरच ते व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधनही करीत आहेत.

वक्तृत्व व आचरण यातील सुसंगती, अपेक्षित समाज परिवर्तन घडविणारे विचार यामुळे तरुण वर्ग त्यांच्या व्याख्यानाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्रातील प्रमुख वक्ते बनले आहेत. कमी वयात आलेले अनुभवांचे वैविध्य, डोळसपणे समाजाकडे पाहण्याची निसर्गत:च लाभलेली दृष्टी, सखोल परीक्षणात्मक क्षमता, चौफेर वाचन, त्या वाचनाला चिंतनाची जोड त्यामुळे समाजाला नवी दृष्टी, नवा विचार, नवी दिशा देण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत.प्र

भावी भाषा, भारदस्त आवाज, आशयाला अनुरूप स्वनिर्मिती तसेच इतिहासाला  वर्तमानाची दिलेली जोड यामुळे सागर पवार यांचे चाहते महाराष्ट्रभर विस्तारत आहेत. 

  • प्रतापगडावर सलग दोनवेळा व्याख्यान

सागर पवार यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शहीद भगतसिंग, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतचरित्रे तसेच वैचारिक, सामाजिक विषयांवर आधारित पाचशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. किल्ले प्रतापगड येथील शासकीय शिवजयंती उत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून सलग दोनवेळा लाभणारे महाराष्ट्रातील ते पहिलेच वक्ते ठरले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त वढू बुुद्रुक येथे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलण्याचा सन्मानही त्यांना लाभला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर