शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीला पळविणारे पाणी थांबवा

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

शिवतारेंनी खडसावले : कुठल्याही दादाच्या दबावाला बळी पडू नका

फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काचे नीरा-देवधरचे पाणी यापुढे बारामतीला जाऊ देऊ नका,’ अशा शब्दात सक्त आदेश देऊन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नीरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडसावले की, ‘तुम्ही अधिकारी आहात की भित्ताड, कोणत्याही दादाच्या दबावाला बळी पडाल, तर याद राखा.’फलटण येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री शिवतारे बोलत होते. ‘जिल्ह्यातील प्रलंबित धरणे व कालव्यांच्या कामांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, ही शासन व आमची भावना आहे. नीरा-देवधरच्या पाण्यावर हक्क नसताना बारामतीला ते पळविले जात आहे. पाण्यावर ज्याचा हक्क आहे, त्यांनाच ते पाणी मिळाले पाहिजे,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी नीरा-उजवाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावले.दरम्यान, त्यावर पाणी वाटप समितीची बैठक झाली असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे संबंधित अभियंत्यांनी सांगितले. यावर शिवतारे चांगलेच संतप्त झाले. ‘तुम्ही अभियंता आहात की भित्ताड. मी सांगतो त्याप्रमाणे करा. समिती बरखास्त झाली आहे. कोणत्याही दादाचा दबाव सहन करू नका. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच मिळेल तेवढे बघा,’असे त्यांनी खडसावले.प्रशासन अद्यापही युती शासनाशी जुळले नसल्याचे निदर्शनास आणून देताच ‘सर्वत्र हीच परिस्थिती आहे. सातारा सरळ केले आहे. आता फलटणही करू,’ असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भूमिपुत्रांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताच, याप्रश्नी आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेतील आग संशयास्पदफलटण पालिकेच्या गोडावूनला बुधवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात आपणाकडे तक्रार आली असल्याने आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.‘श्रीराम’च्या निवडणुकीत पॅनेल उतरवणारश्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले, ‘शिवसेना सर्व समविचारी लोकांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी पॅनेल उतरविणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर यांच्याशी चर्चा झाली असून, या पॅनेलमध्ये निष्ठावंतांना स्थान देणार आहे. यामध्ये दल बदलूंना स्थान असणार नाही. ही निवडणूक आपण गांभीर्याने घेत आहे.’ (प्रतिनिधी)