शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:49 IST

सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यातील खड्ड्यांना दगडांची मलमपट्टी !वाहनधारकांना दिलासा : पालिकेकडून खड्डे मुजविण्याचे काम सुरू

सातारा : सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.सातारा शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांची व्याप्ती वाढत चालली असून, खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शहरातील पोवई नाका ते आरटी कार्यालय, शाहू चौक, राधिका रोड, मार्केट यार्ड, खंडोबाचा माळ, समर्थ मंदिर चौक, बुधवार नाका, मोळाचा ओढा या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.या समस्येबाबत लोकमतमध्ये साताऱ्यातील वाहनधारकांची वाट बिकट या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत पालिकेने बुधवारपासून खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतले. पोवई नाका व समर्थ मंदिर या मार्गावरील खड्डे खडी व मुरूम टाकून ताातडीने मुजविण्यात आले.

रस्त्यांची तात्पुरती का होईना मलमपट्टी केल्याने वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला. खंडोबाचा माळ व राधिका रस्त्यावरील खड्डेही तातडीने मुजवावेत अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर