शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे पाण्यासाठी आता जागते रहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:59 IST

आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ह्यजागते रहोह्णची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पूर्ण फिरवितील म्हणून दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळेच हे पाणी आता तलावाच्या दिशेने येऊ लागलेय.

ठळक मुद्देदुष्काळामुळे पाण्यासाठी आता जागते रहो! टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी

नितीन काळेल सातारा : आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये जागते रहोची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पूर्ण फिरवितील म्हणून दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळेच हे पाणी आता तलावाच्या दिशेने येऊ लागलेय.दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. सांगली जिल्ह्यातील झरे (ता. आटपाडी) येथे असणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून सुटलेलं हे पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने प्रथमच निघालंय. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालाय. प्रत्येकालाच हे पाणी कधी एकदा गावच्या ओढ्यातून वाहत बंधारे भरून तलावात पोहोचतंय, असं झालंय; पण यालाही काही ठिकाणी अडसर येण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.झरे जवळच्याच टेंभू योजनेच्या व्हॉल्व्हमधून आटपाडी तालुक्यातील दिघंची (जि. सांगली) गावाला पाणी जात आहे. मात्र, संबंधित गावाला जाणाºया योजनेच्या जलवाहिनीचे काम थोडेच झाले आहे. असे असलेतरी त्या गावाला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. त्यासाठी शेनवडीमार्गे ओढे, तलावातून संबंधित गावच्या हद्दीत पाणी नेण्याचा लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे अंतर खूप असल्याने संबंधित गावच्या तलावात पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यातच माण तालुक्यातील १६ गावांतूनही पिण्याच्या पाण्यासाठी मागणी होती. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्याने महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सोडले.सध्या दोन्हीकडे पाणी सुरू आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी दोन्हीकडे जात नाही. यासाठी दिघंचीचे ग्रामस्थ व्हॉल्व्ह फिरवून जादा पाणी घेऊन जातील, या भीतीने महाबळेश्वरवाडी, कोरेवाडी, काळचौंडीचे ग्रामस्थ व्हॉल्व्हजवळ दिवसा तसेच रात्रीही मुक्काम ठोकून आहेत. कारण, यापूर्वी दिघंचीच्या ग्रामस्थांनी व्हॉल्व्हजवळ मुक्काम ठोकला होता. आता काहीही करून लवकर पाणी महाबळेश्वरवाडी तलावात कसे पोहोचेल, असाच वरकुटे परिसरातील ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. दोन दिवसात प्रत्यक्षात पाणी तळ्यात पोहोचणार आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSatara areaसातारा परिसर