शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत साताऱ्यात आमरण उपोषण सुरू, रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत

By नितीन काळेल | Updated: January 16, 2024 19:31 IST

जिल्हा परिषदेसमोर उपोषण : शेकडो सहभागी

सातारा : मानधन नको, वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांनी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत सातारा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातून शेकडो परिचालक सहभागी झाले आहेत. तर या आंदोलकांनी दुपारच्या सुमारास अचानक रास्तारोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे पोलिसांनाही धावपळ करावी लागली.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यामध्ये शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत. तर याबाबत प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान मागण्यांबाबत आश्वासन दिल्याने उपोषण थांबवले होते. मात्र, या आश्वासनानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरूवात करण्यात येत आहे.यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा. कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी आमच्या खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला सुरूवात झाली. दुपारी साडेबारानंतर आंदोलक समोरील रस्त्यावर बसून आंदोलन करु लागले. यामुळे कोरेगाव बाजुला जाणारी वाहतूक खोळंबली. तसेच पोवई नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावरही आंदोलक बसू लागले. परिणामी दोन्ही मार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला. याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली.आंदोलकांशी चर्चा केली. पण, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटण्यास ते तयार नव्हते. शेवटी कारवाईचा इशारा देताच आंदोलक पुन्हा उपोषणस्थळी जमा झाले. तर संगणक परिचालकांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत परिचालक आंदोलनस्थळीच होते.मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यात; महिलांचा सहभाग अधिक..साताऱ्यातील संगणक परिचालकांचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केल्याचे आंदोलकांनी सांगितले. या उपोषणात अधिक करुन महिला संगणक परिचालकांचा समावेश असल्याचे दिसून आला. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार परिचालकांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप