शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दरोडेखोरांच्या हातात राज्याच्या चाव्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:14 IST

‘राज्यात कुंपणच शेत खातंय, अशी अवस्था आहे. दरोडेखोरांच्या हाती राज्याच्या चाव्या गेल्या आहेत. शेतकºयांच्या उसाचे पैसे बुडविणाºया साखर कारखानदारांना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पाठीशी घालत आहेत,

ठळक मुद्दे दरोडेखोरांच्या हातात राज्याच्या चाव्या राजू शेट्टी; शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाºया कारखान्यांना सहकारमंत्र्यांची फूस असल्याचा आरोप

सातारा : ‘राज्यात कुंपणच शेत खातंय, अशी अवस्था आहे. दरोडेखोरांच्या हाती राज्याच्या चाव्या गेल्या आहेत. शेतकºयांच्या उसाचे पैसे बुडविणाºया साखर कारखानदारांना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पाठीशी घालत आहेत,’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. ‘देशमुख जिथे असतील, तिथून आम्ही शेतकºयांचे पैसे वसूल करू,’ असा इशाराही त्यांनी साताºयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘ऊसदर नियंत्रण अद्यादेश १९६६ नुसार ऊस घेतल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाचे बिल शेतकºयाच्या बँक खात्यात जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन राज्यातील अनेक कारखान्यांनी केले. खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच लोकमंगल कारखान्याकडे तब्बल १० कोटींची थकबाकी आहे. सरकारच्या बोटचेपी भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ हजार कार्यकर्त्यांचा साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर साखर आयुक्तांनी वसुलीची नोटीस बजावली होती. मात्र, खुद्द सहकारमंत्रीच पैसे बुडविणाºया कारखान्यांना पाठीशी घालत आहेत. सध्याच्या घडीला कारखान्यांकडे असणारी साखर सरकारने जप्त करावी, तिचा लिलाव करावा, साखरेला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकºयांना एफआरपीप्रमाणे दर देणे शक्य आहे. मी सहकारमंत्र्यांशी याबाबत स्वत: जाऊन चर्चा करणार आहे. शेतकºयांना आता पैसे दिले गेले नाहीत तर आम्ही सहकार मंत्र्यांच्या मागे लागू. ते जिथे असतील तिथून वसूल करू.’

दरम्यान, सहकारमंत्री पैसे बुडविणाºया कारखान्यांना पाठीशी का घालत आहेत? या प्रश्नाबाबत बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘या प्रकणामध्ये राजकीय अर्थ काढला जात असला तरी याला भ्रष्टाचाराही वास येत आहे.’ हातकणंगले लोकसभा मतदार संघातील लढतीबाबत विचारले असतात ‘माझे विरोधक एवढ्या विशाल हृदयाचे नाहीत. मला जनतेने १० वर्षे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे ते मी तिसºयांदा निवडणूक लढणार आहे.’

सरकारला विरोध असेल तर जळगाव, सांगली महानगरपालिकेत भाजपची सत्ता कशी आली? याबाबत विचारले असता खासदार शेट्टी म्हणाले, ‘हे टोप्या बदलणाºयांमुळे झाले आहे. या ठिकाणी भाजपचे दोन आमदार आहेत. ’ संपूर्ण कर्जमुक्तीचे विधेयक व शेतमालाला हमीभाव या दोन मुद्द्यांवर भाजप सरकारला आम्ही पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांनी भ्रमनिरास केला होता. आता राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी या दोन मागण्यांवर जाहीरपणे लेखी पाठिंबा दिला आहे.कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा लढणारस्वाभिमानी शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा हे चार लोकसभा मतदारसंघ लढणार आहे. रविकांत तुपकर यांना माढा किंवा बुलडाणा या दोन मतदार संघांपैकी एका ठिकाणी उमेदवारी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त धुळे लोकसभा मतदारसंघही लढण्याची आमची तयारी आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांचा शेतकºयांच्या प्रश्नावर आम्हाला कायमच पाठिंबा मिळत असतो. तसेच या ठिकाणी आमची ताकदही पुरेसी नाही, त्यामुळे येथे लढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टी