वडूज : ‘भारतीय स्टेट बँकेबद्दल अनेक तक्रारी असून, बँकेत ग्राहकांना योग्य वागणूक दिली जात नाहीत, कर्मचारी गरज नसल्यासारखे वागतात, बँकेत येणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन न करता अपमानास्पद वागविले जाते. त्यामुळे ग्राहकसेवेत सुधारणा झाली नाही तर ग्राहक पंचायत याची गंभीर दखल घेईल,’ असा इशारा अखिल ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला.
अ. भा. ग्राहक पंचायतीच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वीजमंडळ, बँकेचे व्यवहार, सदस्य नोंदणी, ग्राहक न्यायालयात करावयाचा अर्ज, प्रवासी दिन याविषयी मार्गदर्शन केले. स्टेट बँकेच्या वडूज, वाई शाखेबद्दल अनेक तक्रारी सदस्यांनी मांडल्या. बँक व्यवस्थापनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली.
बैठकीस उपाध्यक्ष प्रल्हाद कदम, कोषाध्यक्ष विजेंद्र शिंदे, शुभदा नागपूरकर व सर्व तालुक्यांतील अध्यक्ष, संघटक व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. जिल्हा संघटक जयदीप ठुसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी समारोप केले.
०८वडूज
फोटो : ग्राहक पंचायतीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नागनाथ स्वामी, शुभदा नागपूरकर आदींची उपस्थिती होती. ( शेखर जाधव )